-
Nisargakallol (निसर्गकल्लोळ)
कुठे कोरडा दुष्काळ, तर कुठे ओला. कुठे ढगफुटी, तर कुठे अवकाळी गारपीट. एकीकडे वारंवार वणवे, तर दुसरीकडे महापूर. सर्वत्र चर्चा एकच : हवामान कल्लोळ! यात दोष कुणाचा? निसर्गाचा नक्की नाही. तो तर पोरका होतोय! बेसुमार वृक्षतोड, बेफाम खाणकाम. अनिर्बंध बांधकाम आणि अविचारी पाडकाम. मानवाने निसर्गाची हत्या चालवली आहे. पण निसर्गाची हत्या म्हणजे माणसाची आत्महत्या. कशी, ते सांगत आहे...
-
Pruthvicha Aakhyan (Pruthvicha Aakhyan)
मानवानं निसर्गाच्या विरोधात युद्ध पुकारलं आहे. आणि हे आत्मघातकी आहे. प्रक्षुब्द्ध झालेला निसर्ग निकरानं परतीचा प्रबळ हल्ला करत आहे. पाणथळ जागा संपत चालल्या असून वाळवंटं वाढत आहेत. अरण्यतोड थांबत नाही. जैवविविधता कोसळत आहे. दहा लाख प्रजाती समूळ उच्चाटनाच्या धोक्यात आहेत. सर्व महासागर प्लॅस्टिकने तुंबून जात आहेत. आपल्या डोळ्यांदेखत पर्यावरणीय यंत्रणा नष्ट होत आहेत. सध्या जग कडेलोटाच्या बिंदूवर येऊन ठेपलं आहे. सध्या चालू असलेल्या ह्या बहुविध अराजकाला मानवी कृत्येच जबाबदार आहेत. याचा अर्थ मानवी कृतीच त्यांना रोखू शकते. आणि त्यासाठी हे दशक निर्णायक ठरणार आहे. माणसाने चालवलेले अनन्वित अत्याचार झेलणाऱ्या
-
Swaminathan Bhukmukticha Dhyas (भूकमुक्तीचा ध्यास)
स्वामीनाथन : भूकमुक्तीचा ध्यास (चरित्र) - हरित क्रांतीच्या प्रणेत्यांपैकी एक असलेले कृषीवैज्ञानिक एम. एस. स्वामिनाथन यांचे व्यक्तित्व, विचार व कार्य यांचा वेध घेणारे पुस्तक.
-
Gretachi Haak Tumhala Aiku Yetey Na (ग्रेटाची हाक
एक पंधरा वर्षांची शाळकरी मुलगी शाळेत जाण्यास नकार देते. हा गुन्हा आहे हे माहीत असूनही तो ती करते. त्यातून जगातील लाखो मुलांना स्फूर्ती मिळते. त्यानंतरच्या घटनाक्रमाने संपूर्ण जग हादरून जाते. कोणतीही कृती छोटी नसते हेच स्वीडनच्या ग्रेटा थुनबर्गने दाखवून दिलं आहे. नेमका ऋतू कोणता हा प्रश्न एका क्षणी पडावा तर पुढच्या क्षणी त्याचे अतिरेकी रूप पाहून भीतीने गाळण उडावी, अशी ऋतूंची दहशत जगभर पसरली आहे. हवामान संकटाने जग हवालदिल झालं आहे. आपली वाटचाल ही समूळ उच्चाटनाकडे आहे. याला जबाबदार कोण? विज्ञान व वैज्ञानिक 1965 पासूनच, ‘कर्बउत्सर्जन रोखून शून्यावर आणले नाही तर जग धोक्यात येईल’, असे इशारे देत आले आहेत. परंतु कुठल्याही राष्ट्रप्रमुखांनी या इशार्यांना मनावर घेतलं नाही. आता जग कडेलोटाला आलं आहे. ग्रेटा आणि लाखो मुले जगातील नेत्यांना व उद्योगपतींना याचा जाब विचारत आहेत. संयुक्त राष्ट्रसंघात ग्रेटा कडाडली, “मानवजात व जीवसृष्टी नायनाटाच्या मार्गावर असताना तुम्ही पैसा व आर्थिक विकासाच्या परीकथा सांगत बसता. तुमची हिंमत होतेच कशी? तुम्ही आम्हाला फसवत आहात आणि आम्ही हे सहन करणार नाही.’’ कार्बनमुळे काळवंडून गेलेलं जग स्वच्छ व शुभ्र व्हावं, यासाठी बलाढ्य प्रदूषकाशाहीच्या विरोधातील लढ्यात आता जगातील मुलांच्या सोबतीने शिक्षक, कलावंत, वैज्ञानिक, अर्थतज्ज्ञ आले आहेत. प्रश्न आहे तो धोरणकर्त्यांचा आणि त्यांच्या कृतीचा!
-
Vishwache Aarta (विश्वाचे आर्त)
पर्यावरण हा तसा आपल्या सर्वाच्याच जगण्याला वेढून असलेला विषय, तरीही आपण पर्यावरणाच्या संदर्भात कमालीचे गाफील आणि बेफिकीर असतो. पाणी, जमीन, जंगल अशा सर्वच घटकांबाबत असलेली आपली बेपर्वाई एक दिवस आपला कडेलोट करणार, असे आपण वारंवार वाचतो, ऐकतो, तरीही याबाबत आपण किंचितही गंभीर नसतो. सर्वच पातळ्यांवर दिसून येणारी ही अनास्था हा अतुल देऊळगावकर यांच्या 'विश्वाचे आर्त' या पुस्तकाचा गाभा आहे. पर्यावरण ही बाब केवळ नैसर्गिक नाही तर त्यात बेमालूमपणे सामाजिक आणि राजकीय रंगही मिसळले आहेत, हे साधार दाखवून देतानाच सध्या जैवविविधता जपणारे व नष्ट करणारे यांच्यातल्या संघर्षांचे अनेक पैलू देऊळगावकर उलगडतात. अभ्यासकांच्या अहवालापासून ते समकालीन साहित्य, चित्रपट, छायाचित्रे अशा विपुल संदर्भासह त्यांनी हा विषय मांडला आहे. तरीही केवळ संदर्भ किंवा आकडेवारीत हे पुस्तक गुरफटले नाही तर सुरुवातीपासून शेवटापर्यंत ते आपल्याला भानावर आणण्याचे काम करते. प्रश्नांची उकल, दुसरी बाजू आणि उपाय अशा पातळ्यांवर विषयाचा धांडोळा घेत असतानाच आपल्यातल्या विवेकबुद्धीला आवाहन करण्याचे काम करते.
-
Vishwache Arta (विश्वाचे आर्त)