-
Shakakarte Shivray (शककर्ते शिवराय)
महाराज! जिवंतपणा, जागेपणा, बाणेदारपणा, ईश्वरापर्णवृत्ती या गुणसमुच्चयाचं सगुण रूपं असलेल्या जीजाबाईसाहेबांचे पोटी जन्म घेऊन असं एक हिंदवी-स्वराज्य आपण आम्हाला दिलंत की, बैराग्याची छाटी हाच जिथला झेंडा होता! हर हर महादेव हाच जिथला महामंत्र होता! सह्याद्रीच्या कुशीतील गोरगरीब मावळे हेच जिथलं बळ होतं ! हे राज्य श्रींचे' हाच जिथला अढळ विश्वास होता!- आणि, महाराष्ट्रधर्म वाढविणं हाच जिथला कर्मयोग होता! या हिंदवी स्वराज्याच्या आदर्शानुरूप नवे राष्ट्रशिल्प घडविण्याची जिद्द आमच्या अंतःकरणात स्फुरण पावू द्या... या कळकळीच्या प्रार्थनेसह हे शब्दबिल्व आपल्या चरणी समर्पित! (खंड १ व २ एकत्र)
-
Maharajyanchya Mulukhat (महाराजांच्या मुलुखात)
महारजांचा मुलुख! सह्याद्रीच्या खोल पातळदरया आणि उत्तुंग सुलक्यांनी भरलेला. साथीला काटेरी निवडुंग. किनारपट्टीलगत खळखळणारा दर्या या दर्यात नि डोंगर माथ्यावर राजांचे दुर्गम दुर्ग. महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले. ओबडधोबड दिसणारया या महारजांचा मुलुखात अनेक प्रवासी भक्तीभावनं भटकत असतात, महाराजांच्या पदचिन्हांचा मागोवा घेत. लेखकही असा एक प्रवासी. शिवकाळात कुठेतरी हरवलेला आणि वर्तमानात क्षणोक्षणी धूसर होत चाललेला. महाराजांच्या मुलुखात 'महाराज' शोधायला निघालेला! - जे गवसले ते प्रमाणिकपणे इथे मांडले आहे.