-
The Darker Side (द डार्कर साइड)
अमेरिकेच्या भावी राष्ट्राध्यक्षांच्या मुलीचा (...की मुलाचा?) विमानात, तीस हजार फूट उंचीवर झालेला खून म्हणजे; हिंस्र मधमाशांच्या पोळ्यावर मारलेला दगडच ठरतो. एकामागोमाग एक खून उघडकीस येतात. खुनी माणूस जाहीररीत्या पूर्वसूचना देऊन खून करू लागतो. या खुन्याची शिकार करायला निघाली आहे; एफ.बी.आय.ची स्पेशल एजंट स्मोकी बॅरेट. भूतकाळाचं प्रचंड ओझं मनावर असलेली, एका हल्ल्यात पती व मुलीला गमावून बसलेली, बलात्कार झालेली आणि तरीही त्वेषाने खुन्याला पकडण्यासाठी सज्ज झालेली! कोण बाजी मारणार या अघोरी सामन्यात? क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणाऱ्या या कथासूत्रात गुरफटून जाण्यासाठी तयार व्हा! लीसा रीडच्या खुन्याचा तपास एजंट बॅरेटच्या हाताखाली चालू असतो, तोच रोझमेरीच्या खुनाची बातमी येते आणि समोर येते, एक काळीकुट्ट खुनांची मालिका...
-
Ramniy Sagarkinare ( रमणीय सागरकिनारे )
सूर्योदयाबरोबर आकाशात होणारी चैतन्यदायी अभांची रंग उधळण आणि मावळत्या दिनकराची सोनेरी शीतल किरणे; यांच्याशी रंगसंगती साधते. समुद्रकिनारयांची आणि त्यांच्या लोभस वाळूची वळणे. सागरवेळा आणि तिची श्रवणीय गाज त्या रत्नाकरासारखेच विवध प्रकारच्या पुळणीनी गुंफलेले हे रमणीय सागरकिनारे म्हणजे भारतमातेच्या गळयातील जणू रत्नहारच!
-
Vishal Himaalay ( विशाल हिमालय )
सह्याद्रीप्रमाणेच हिमालयाच्या पर्वतरांगा पर्यटकांना आणि भक्तांना खुणावत असतात. गिर्यारोहकांना तर हिमालय आपला सखा वाटत असतो. डॉ. प्रकाश जोशी यांनी हिमालयाच्या रांगांतील विविध ठिकाणांची सफर कशी करावी, याचे मार्गदर्शन यात केले आहे. चार हजार किलोमीटर लांबीच्या या ग्रेटर हिमालयीन रांगांची ही सफर आनंद देते. घरबसल्या मानसयात्रा घडवून आणणारे हे पुस्तक आवर्जून वाचावे असे आहे.
-
Rutuvaibhav
वसंतॠतू ते शरदॠतू अशा सहाही ऋतूंमधले, सृष्टीच्या विविध आविष्कारांचे, पशुपक्ष्यांचे, नयनरम्य डोंगरद-याचे, निर्झरांचे... वर्णन. डोळ्यांचे पारणे फेडणा-या अशा सौंदर्याबरोबरच देश-विदेशातील कला, संगीतासह संस्कृती-संमेलनाचे चित्रदर्शी आरेखन म्हणजेच 'ॠतुवैभव!' निसर्गातल्या विविधतेने नटलेल्या, रंग-गंध-लय-ताल-नाद-स्पर्श या संवेदनाचं विश्व अमर्याद आहे. मन:पूत भटकंतीतून या निसर्गसौंदर्याचा रसिकमनाने घेतलेला हा आस्वाद वाचकांना मोहित तर करीलच, शिवाय पर्यटनालाही उद्युक्त करील.