-
Dhuke (धुके)
'धुके' हा कथासंग्रह प्रसिद्ध राजस्थानी लेखक माधव नगदा यांच्या 'शापमुक्ती' या कथासंग्रहाचा मराठी अनुवाद आहे. माधव नागदा यांच्या अर्थपूर्ण आणि समाजमनातील भाव भावना अचूकपणे टिपणा-या कथा वाचून मी भारावून गेलो. या कथा मराठी वाचकापर्यंत पोहचाव्यात या हेतूने मी त्यांच्या 'शापमुक्ती' कथासंग्रहाचा अनुवाद केलाय. या कथासंग्रहातील प्रत्येक कथा वेगवेगळ्या विषयाशी निगडीत असून वाचकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवण्याचे सामर्थ्य असणारी आहे.