-
Charlatans (शार्लटन्स)
बोस्टन मेमोरिअल हॉस्पिटलमधील एका लोकप्रिय कर्मचऱ्याचा ऑपरेशन दरम्यान मृत्यू... त्यानंतर आणखी दोन मृत्यू...तीनही वेळेला अॅनेस्थेसियॉलॉजिस्ट म्हणून डॉ. एवा लंडन...... डॉ. नोहा हा सुपर चीफ सर्जिकल रेसिडेन्ट याची चौकशी करतोय... नोहा आणि एवाचं प्रेमप्रकरण...एवाऱ्याभोवती गूढतेचं वलय...अचानक ते दुरावतात...नोहाला निलंबित केलं जातं...त्याचा पाठलाग होत असतो... काय रहस्य असतं एवाचं? नोहाचं निलंबन मागे घेतलं जातं का? उत्कंठावर्धक कादंबरी.
-
The Girlfriend (द गर्लफ्रेंड)
डॅनिएल हा हॉवर्ड व लॉरा या दाम्पत्याचा डॉक्टर होऊ पाहणारा लाडका मुलगा. हे कुटुंब सुखवस्तू आहे. चेरी नावाची गरीब घरातील मुलगी त्याच्या प्रेमात पडते. तो तिला त्याच्या आई-वडिलांना भेटण्यासाठी घेऊन येतो; पण त्याच्या आईच्या, लॉराच्या लक्षात येतं की, चेरीची नजर त्यांच्या संपत्तीवर आहे. लॉरा ही गोष्ट डॅनिएलला समजावू पाहते; पण त्याला ते पटत नाही. तो आणि चेरी एकदा वीकेन्डला गेलेले असताना अपघात होतो आणि डॅनिएल कोमात जातो. त्या अपघाताला अप्रत्यक्षरीत्या चेरीच जबाबदार असते. डॅनिएल गेला, असं लॉरा तिला खोटंच सांगते. काही दिवसांनी डॅनिएल शुद्धीवर येतो, तेव्हा चेरी त्याला सोडून गेली, असं लॉरा त्याला सांगते. डॅनिएल जिवंत असल्याचं जेव्हा चेरीला समजतं, तेव्हा ती लॉरासमोर येऊन उभी ठाकते. मग दोघींमध्ये रंगतो शह-काटशहाचा सामना. मग चेरी ठरवते, लॉरालाच नाहीसं करायचं. काय घडतं पुढे? चेरी यशस्वी होते का? प्रेमकहाणीच्या आडून रंगलेलं एक जबरदस्त, थरारक संघर्षनाट्य.
-
Resonance (रेझोनान्स)
"मुंबईवरचा हल्ला ही केवळ एक झलक होती. यावेळी अतिरेक्यांनी प्रचंड मोठा कल्पनातीत आघात करून हिंदुस्थानचा सर्वनाशच करायचं ठरवलं होतं. एक कुठलातरी अर्धामुर्धा शब्दप्रयोग आयबीचा जॉइंट डायरेक्टर सिद्धार्थ राणा याच्या कानावर येतो `टू पाक..’ बऱ्याच खटपटीनंतर त्याला दोनच दिवस आधी हल्ल्याची तारीख कळते; पण स्थान, वेळ निसटून जात असतो. करोडो लोकांचं आयुष्य पणाला लागलेलं असतं. त्यातच सिद्धार्थला काही फितुरांशीदेखील सामना करावा लागतो. भौतिकशास्त्राच्या मूलभूत नियमांवर आधारित, अद्ययावत माहिती आणि तंत्रज्ञानाच्या साहाय्यानं तडीला नेता येणारा महाभयंकर कट शिजलेला असतो. त्यात एका गूढ व्यक्तीची भर पडते आणि खेळ रंगत जातो. अतिशय गुंतागुंतीची, वेगवान घडामोडींनी भरलेली काल्पनिक कादंबरी उत्कर्ष बिंदूपर्यंत पोचते आणि... "
-
Akash Badaltana (आकाश बदलताना)
लंडन: तिशीच्या आसपासची ती मंडळी त्यांच्यातल्या एकाचा वाढदिवस साजरा करायला जमाली होती. वरवर बघायला हयात विशेष काही नहव्तं सगळं छान नार्मल वाटत होतं. पण ह्या चित्राचे अंतरंग मात्र वेगालेच होते. अखंड साधनेच्या जोरावर क्लेअरचे प्रथितयश नर्तिका म्हणून नाव कमविण्याचे चांगले आकाराला आलेले स्वप्न रस्त्यावरील एका अपघातामुळे अचानक धुळीला मिळाले होते. त्यातून सावरण्यासाठी तिला अँथनीची साथ मिलाली खरी; पण लग्नाला काही वर्ष होऊं गेली, तरी त्यांना मूल होत नव्हतं. मात्रुत्वाची आस असलेल्या क्लेअरला, ह्या समस्येवारिल खर्चिक उपाययोजनांना सामोरे जात असतानाच, आपल्या नोरा नावाच्या छोट्या विद्यार्थिनिचा ज़रा जास्तच लळा लागला होता. ही मानसिक उलघाल कमी होती म्हणून की के अँथनीच्या नोकरीवर गदा येउ घातली होती. ह्या पार्श्वभूमीवर नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे शहरात प्रचंड तणाव होता. दिवसेंदिवस बकाल होत चाललेल्या ह्या शहरात तग धरून राहणे आनाखिनाच कठीन होउ लागले होते. आपल्या अतिरेकी जखमांवर फुंकर घालणारे एक अशांत शहर, आर्थिक, सामजिक व् मानसिक तणावांनी ग्रासलेली एक विवाहिता ह्यांचे दहशदवादाच्या पार्श्वभुमिवारिल मनोवेदक चित्रण.