-
Mantra (मंत्र)
पितृछत्र हरपलेल्या कोवळ्या वयातल्या उत्तरणला त्याची आई संन्यासी ब्रह्मचारी ठाकूर यांच्या पायाशी समर्पित करते. परंतु कठोर वास्तवाच्या आघातामुळे एके दिवशी उत्तरणला आश्रम सोडून निघून जावं लागतं. आश्रम सोडल्यानंतर जिच्या घरी त्याला आसरा मिळतो, त्या अनसूयेला उत्तरणच्या सेवेत स्वतःला वाहून घ्यायचंय. संसार करावा की व्रतस्थ आयुष्य जगावं अशा संभ्रमावस्थेत असतानाच उत्तरण विचारांच्या एका वळणावर अनुसूयेसोबत विवाह करण्याचा निर्णय घेतो. हे नातं पुढील आयुष्यात कोणतं वळण घेतं? उत्तरणपुढे कोणते पेच निर्माण होतात? या व इतर पेच प्रसंगांची उकल कशी होत जाते? लेखक बिनायक बंद्योपाध्याय त्यांच्या संवादी शैलीत ही कथा या कादंबरीत समर्थपणे रंगवत जातात. ईश्वरासोबत एकरूप होत आयुष्यातील विविध प्रश्नांची उत्तरं शोधू पाहणाऱ्या एका ‘संसारी संन्याशाची’ अध्यात्मिक धाटणीची कादंबरी… मंत्र !
-
Tutaleli Taar (तुटलेली तार)
मानवी मनाचा थांगपत्ता लागणं म्हणजे महाकर्मकठीण. दोन जीव विवाह बंधनात अडकल्यावर त्यांचातील नातेसंबंधांचे तरल धागेदोरे उलगडणं जवळजवळ अशक्य. शुभमय आणि त्याची पत्नी ऋती. शुभमय जिल्ह्याच्या न्यायालयाचा जज्ज.पराकोटीचा आदर्शवादी आणि नितीनिष्ठ. ऋती कवयित्री आणि मनस्वी जीवन जगणारी. त्यांची एकुलती एक मुलगी मुनिया. तिच्या वियोगानंतर उभयंताच्या नातेसंबंधात निर्माण झाले अगणित तणाव. ते कोणते आणि पुढे काय घडलं, हे समजण्यासाठी आवर्जून वाचायला हवी सुचित्रा भट्टाचार्य यांनी सूक्ष्म विश्लेषणात्मक अंगानं लिहिलेली बंगाली कादंबरी - 'तुटलेली तर' उत्कंठावर्धक आणि शेवटच्या पानापर्यंत वाचकांना श्वास रोखून धरायला लावणारी.