-
Propganda (प्रोपगंडा)
आजची फॅशन - मग ती कपड्यांची असो, की विचारांची - येते कोठून? कोणाची निर्मिती असते ती? कोणापासून सुरू होते ती? सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आपण ती फॅशन का अंगीकारतो? आपली मते खरोखरच आपली असतात का? आपण जे वास्तव समजतो ते वास्तवच असते का? सत्य मानत असतो ते सत्यच असते का? की कोणीतरी भरवत असते ते सारे आपल्याला एखाद्या संगणकाच्या प्रोग्रॅमप्रमाणे? तसे नसेल, तर मग माणसांच्या झुंडी कशा निर्माण होतात? या झुंडींना हवे तसे, हव्या त्या मार्गाने कसे वळविले जाते? साधी साधी माणसे अचानक हिंसक का होतात? बासरीवाल्याच्या मागे उंदरांनी जावे तशी एखाद्या नेत्याच्या मागे का जातात? एखाद्या वस्तूचे, विचाराचे, नेत्याचे अवडंबर कसे माजविले जाते? कसे बदल केले जातात समाजाच्या वर्तनात? हे सारे करणारे असते तरी कोण? अदृश्य सरकार. माईंड-बेन्डर्स. प्रोपगंडाकार! ही कहाणी आहे या सगळ्याची. अपमाहितीची, अर्धसत्यांची, बनावट वृत्तांची. आपल्याला वेढून टाकणार्या प्रोपगंडाची. त्याच्या तंत्र आणि मंत्रांच्या काळ्याकुट्ट, परंतु तेवढ्याच थरारक इतिहासाची.
-
Man Hunt (मॅन हंट)
ओसामा बिन लादेन आणि अलकायदाने अमिरिकेविरुद्द्ध युद्ध पुकारल्या नंतर अमिरकेच्या प्रत्यक्ष धरतीवर झालेला पहिला दहशत हल्ला म्हणजे ९/११! या हल्ल्याने अमेरिकी नागरिकांच्या मनात असु रक्षिततेची भावना निर्माण केली आणि प्रशासन, लष्करी यंत्रणा आणि गुप्तचर संस्था यांच्या कार्यक्षमतेबद्दल प्रश्न उप स्थित केला. त्यामुळे 'बिन लादेनचा खातमा त्यानंतर अमेरिकेच्या अस्मितेचा प्रश्न बनला. तरीसुद्धा तब्बल १० वर्ष अमेरिकच्या तमाम अत्याधुनिक आणि अद्यावत यंत्रणेला गुंगारा देण्यात ओसामा बिन लादेन यशस्वी ठरला. त्यामुळे त्याच्या शोध मोहिमेची ही कथा ल क्षवेधी आणि थरारक ठरते!