-
Ideal D.P.M. (आयडियल डी.पी.एम )
मिळालेलं काम चोख आणि वेळेवर किंबहुना वेळेच्या आधीच करणं याचंच व्यसन यश मिळालं, पैसे मिळाला या वृतीचा परिणाम म्हणून. भौतिक गोष्टीनच स्वप्न कधी पाहिलं नाही आणि त्यासाठी कधी काम केलं नाही. काम हेच ध्येय आणि लक्ष कायम त्या ध्येयावर. प्रचंड मेहनत आणि जिद्ध आणि पराकोटीची चिकाटी हेच त्रिगुण साहेबांच्या समग्र यशामागचं रहस्य. पैसा ही नक्कीच आहे. तो गरजेपुरता मिळायला हवा. तो गरजेपेक्षा अधिक मिळवण्यातही गैर काही नाही. पण पैसा मिळवण्याचा मार्ग सरळ हवा. पैसा कसा येतो आणि त्याचा विनियोग कसा होतो या दोन गोष्टीवरच तो टिकतो किंवा नाही हे अवलंबून असतं.