-
Atmachi Diary (आत्माची डायरी)
एखादा माणूस डायरी का लिहितो तर त्याला आपल्या आयुष्यातील बऱ्या-वाईट आठवणींची नोंद करून ठेवायची असते. अशा नोंदी मुख्यतः स्वतःसाठी असतात. पण त्या इतरांपर्यंत पोहोचाव्यात अशी एक सुप्त इच्छाही त्यामागे असते. म्हणजेच एखादी डायरी ही एकाच वेळी खाजगी आणि त्याचवेळी सार्वजनिक रूपाचा दस्तऐवज ठरत असते. आपली सुख-दुःखे, आपले यशापयश, आपली स्वप्ने, आपल्या जगण्याची सूत्रे आप्तेष्ट-मित्रांसमोर व्यक्त करावीत, त्यांच्यासमोर आपले मन मोकळे करावे असा आत्माराम यांचा प्रांजळ हेतू या लेखनामागे दिसतो. A man is known by the company he keeps, असे म्हटले जाते. आत्माराम यांच्या या डायरीतील त्यांचा गोतावळा पाहिला की त्यांची संवेदनशीलता आणि सर्वसंचारी वृत्ती लक्षात येते. प्रज्ञा, प्रतिभा,ओज, विजिगीषु वृत्ती याबरोबरच माणुसकी, सहवेदना, करूणा या साऱ्या भावनांचा उत्स्फूर्त आणि प्रसन्न आविष्कार या डायरीत जागोजागी होताना दिसतो. अशा तऱ्हेने एकत्र आलेल्या विविध व्यक्तिमत्त्वांच्या रंगीबेरंगी फुलांचा हा गुच्छ त्याच्या रंग-रूपामुळे आणि त्यातील अमृत-तत्वामुळे वाचकाचे मन प्रसन्न आणि तृप्त करून टाकणारा झाला आहे.
-
Ladak (लडाक)
मला हायकींगची फारच आवड आहे. हायकींगप्रमाणे लडाखला जायची माझी फार इच्छा होती. मला जायचं होतं. तेव्हा आत्माराम परब यांचं नाव सुचवलं गेलं. मला फार कुतूहल वाटलं आणि मी लगेच लडाखला जायचं नक्की केलं. माझ्या मानतील इच्छा वयाच्या चौरयाहत्तराव्या वर्षी पुर्ण झाली. या सहलीत आम्हाला घरगुती वातावरणात वावरल्याच आनंद मिळाला. आत्माराम बरोबर केलेली ती सफर अविस्मरणीय अशीच होती. नंतर मी ईशा टुर्स बरोबर सहकुटुंब भुतानलाही जाऊन आलो. आणखी बरयाच देशात मला आत्माराम बरोबर जायचं. आंतरराष्ट्रीय किर्तीचे न्युरो स्पायनल तज्ज्ञ डॉ. प्रेमानंद रामाणी