-
Shridnyaneshwaranchya Haripathache Amrutmantra (श्
डॉ. सौ. अनुराधा सधीर कुलकर्णी यांनी हरिपाठातल्या प्रत्येक अभंगाचा प्रथम सरलार्थ दिला आहे. आणि त्यानंतर विस्तृतपणे अभंगातल्या प्रत्येक चरणाचे अप्रतिम विवरण केलेले आहे. त्यामुळे प्रत्येक अभंग वाचत असताना आपल्या त्वरित लक्षात येते की, पावसाच्या धारा जशा मातीमध्ये झिरपतात तसे आपले अभंग आपल्या मनात झिरपत आहेत. अर्थविवरणामुळे एक होते की, माउलींच्या अंत:करणातले भाव आपल्याला काहीसे कळतात. डॉ.सौ.कुलकर्णी यांचे अवघे ज्ञानमय आणि भक्तिमय आयुष्य ज्ञानदेवमय झालेले आहे. यांच्या संशोधनाचा अभ्यासाचा आणि ध्यासाचा विषय एकच, तो म्हणजे ज्ञानदेव. एक अप्रतिम असा भाष्यग्रंथ वाचल्याचे समाधान 'श्रीज्ञानेश्वरांच्या हरिपाठाचे अमृतमंत्र' ने मला निसंशयपणे दिला. एक वाचनीय, मननीय आणि चिंतनीय ग्रंथ म्हणून हा ग्रंथ मला अत्यंत महत्वाचा वाटतो. संत वाङ्यमयात या ग्रंथामुळे मोलाची भर पडली आहे.