-
Bhatkanti Saptarangi Betanchi (भटकंती सप्तरंगी बेट
कोणतंही बेट म्हटलं की आपलं कुतूहल चाळवतं आणि जगात तर अशी अनेक बेटं आहेत जी अक्षरश : स्वप्ननगरी वाटावीत… अशाच काही अनोख्या आणि अपरिचित बेटांची आपल्याला सैर घडवून आणत आहे प्रधान दाम्पत्य ! विशेष गर्दी नसलेल्या पण वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या बेटांवर जाऊन राहणं, तेथील निसर्ग भरभरून अनुभवणं, तेथील स्थानिक खाद्य-पेयांचा आस्वाद घेणं, घेणं तेथील वेगळी संस्कृती, प्रथा समजून हा प्रधान दाम्पत्याचा आवडीचा उद्योग…. गाठीला असलेला हा अनुभव रसिक वाचकांसमोर खुला करून प्रधान ती बेटं, तो प्रदेश डोळ्यासमोर उभा करतात. अशा तऱ्हेच्या फिरण्यातून पर्यटनाचा एक वेगळा आनंद कसा मिळू शकतो याची एक नवी दृष्टी ते पर्यटकांना भटकंती सप्तरंगी बेटांची या पुस्तकातून देतात . कोणत्या बेटांची सफर आहे या पुस्तकात ? ऐकलं आहे का तुम्ही या बेटांबद्दल ? स्पेनमधले बॅलेॲरिक आणि कॅनरी आयलंडचे अप्रतिम समुद्रकिनारे ११५ लहान – मोठ्या बेटांचा समूह सेशेल्स जागतिक पर्यटकांचं हॉट डेस्टिनेशन हवाई बेटं ग्रीस मधली पांढरी निळी बेटं लहान – मोठ्या १७,५०० बेटांचा मिळून झालेला व प्राचीन वारसा लाभलेला इंडोनेशिया नयनरम्य निसर्गसौंदर्याने नटलेली इटलीमधील लोकप्रिय बेटं .. अशा अनेक बेटांची सप्तरंगी सफर…
-
Batamimagachi Batami (बातमीमागची बातमी)
हातात वृत्तपत्र घेतल्यानंतर सर्वप्रथम नजर जाते ती त्या दिवशीच्या ‘एक्सक्लुसिव्ह' बातमीकडे. या बातम्या नुसत्या मनोरंजक नसतात, उलट या बातम्या समाजमनावर मोठा प्रभाव पाडतात, त्यातून अनेकदा अपेक्षित बदलही घडतात. काही अनिष्ट गोष्टींना पायबंदही होऊ शकतो. अशा ‘एक्सक्लुसिव्ह' बातम्या पत्रकार मिळवतो तरी कशा? काही बातम्या अगदी सहज गप्पा मारताना मिळून जातात, तर काही ‘स्पेशल सोर्सेस'कडून मिळतात, काही उच्चपदस्थांचा विश्वास संपादन करून मिळवलेल्या असतात, तर काही अगदी अपघाताने... थोडक्यात काय, कोणतीही विशेष बातमी मिळवण्यामागे पत्रकाराची चिकाटी, कौशल्य, दूरदृष्टी आणि कल्पकता पणाला लागलेली असते ! अशाच काही राजकीय, समाजिक आणि गुन्हेगारी जगतातील गाजलेल्या बातम्या मिळवतानाचे तपशील आणि रंजक नाट्य प्रत्यक्ष बातम्यांसह उलगडून दाखवणारं ‘एक्सक्लुसिव्ह' पुस्तक...‘बातमीमागची बातमी !'