-
Careerchya Vegalya Vata ( करिअरच्या वेगळ्या वाटा )
दहावी-बारावीनंतर विद्यार्थ्यांचे करिअर घडत असते. त्यामुळे या परीक्षांना व त्यानंतर निवडलेल्या अभ्यासक्रमांना महत्व आहे. पण, काही वेळा अभ्यासक्रमांच्या माहितीची, योग्य मार्गदर्शनाचा अभाव असल्याने नेहमीच्या वाटेवरचे अभ्यासक्रम निवडले जातात. त्यातून पुढे अपेक्षाभंग होऊ शकतो. हे टाळून करिअरच्या योग्य अभ्यासक्रमाची निवड कशी करवी, याचे मार्गदर्शन किरण जोग यांनी 'करिअरच्या वेगळ्या वाटा'मध्ये केले आहे. देशभरतील ६२० अभ्यासक्रमांची नावे यात आहेत. त्यातून विद्यार्थ्यांना योग्य करिअरची निवड करता येईल. बुद्धांकाप्रमाणे भावनांक लक्षात घेऊन आपल्या आवडत्या करिअरमध्ये यशस्वी होण्याचा सल्ला जोग देतात.