-
Saigalswaryug (सैगलस्वरयुग)
कुंदनलाल सैगल ह्या स्वातंत्र्यपूर्व काळातील गायकनटाचे हे सांगीतिक चरित्र. सैगलच्या चित्रपटांबरोबरच त्या त्या सालातील प्रमुख हिंदी आणि मराठी चित्रपटांचे तसेच सैगलच्या गाण्यांची आणि त्याच्या संगीतकारांची चर्चा करताना त्या त्या सालातील गाजलेल्या अन्य गाण्यांचे, ती गाणार्या गायक-गायिकांचे आणि त्यांच्या संगीतकारांचेही उल्लेख येथे येतात. त्यामुळे सैगलच्या काळातील एकूण चित्रपटसृष्टीचे आणि खास करुन त्यातील संगीताचे बदलते स्वरूप या पुस्तकातून आपोआप उलगडले गेले आहे. सैगलवर जे संगीतसंस्कार झाले त्या संदर्भात त्याच्या बालपणी म्हणजे विसाव्या शतकाच्या सुरुवातीस भारतीय समाजात संगीतपरंपरा काय होती, त्याचीही माहिती या लेखनातून मिळते. 1933 ते 1947 हा सैगलचा सुवर्णकालखंड. `सैगलस्वरयुग’ म्हणता येईल अशा या कालखंडाची ही एक संगीतसफर. त्या कालखंडातील अनेकांचे भावविश्व आणि मनाच्या सांस्कृतिक क्षितिजाच्या सीमा विस्तारण्यात सैगलचा नि:संशय वाटा होता, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.