-
Sapienscha Janak : Yuval Noha Harari (सेपियन्सचा जनक युवाल नोआ हरारी)
युवाल नोआ हरारी याने मानवाच्या उत्क्रांतीपासून ते त्याच्या भविष्यातील तंत्रज्ञानापर्यंतच्या आपल्या विचारांनी जगाला हादरवून टाकले आहे. त्याच्या प्रत्येक पुस्तकाने वाचकांना विचार करण्यास प्रवृत्त केले आहे. त्याची 'सेपियन्स', 'होमो डेअस' आणि '21 लेसन्स फॉर द 21" सेंच्युरी' ही पुस्तके माणसाच्या जीवनाचा अभ्यास करतात. त्याच्या या अभ्यासपूर्ण चरित्रात त्याची जडणघडण, निसर्गाने त्याच्यावर केलेल्या अन्यायावर त्याने मिळविलेला विजय, त्याचे तत्त्वज्ञान आणि त्याच्या जागतिक दृष्टिकोनाला आकार देणारे निर्णायक क्षण यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्या सर्वाधिक विकल्या गेलेल्या पुस्तकांमागील प्रेरणा, मानवी इतिहासावरील त्याचे प्रतिबिंब आणि पुढे येणाऱ्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी तो सुचवत असलेले मार्ग मांडण्याचा प्रयत्न केला आहे. इतिहासकाराबरोबरच व्यक्तिगत बाजू म्हणजे शाकाहारी, ध्यान करणारा आणि या गुंतागुंतीच्या जगात स्पष्टतेचा पुरस्कार करणारा हरारी, तुम्हाला या चरित्रातून दिसेल. तरुण पिढीचा आयकॉन असलेल्या हरारीचे हे चरित्र निव्वळ एका यशस्वी व्यक्तीचे नसून, ते एका विचारवंताची जडणघडण उलगडणारे आहे. अरविंद व्यं. गोखले (ज्येष्ठ संपादक)
-
Kiwiyo Safar New Zealandchi (किंवियो सफर न्यूझीलंड
विजय लोणकर यांचे अगदी साधे लेखनसुद्धा चटकदार व खुसखुशीत असते. पुणे शहराएवढी लोकसंख्या असलेला न्यूझीलंड हा देश प्रामाणिकपणात आणि सचोटीमध्ये सर्वप्रथम आहे. अशा या देशाचे लोणकरांनी लिहिलेले हे प्रवासवर्णन वाचून माझ्यासारख्या इतरांनाही त्या देशा जावे असे वाटण्यास भाग पाडणारे आहे, इतके हे वर्णन सर्वांगसुंदर आणि परिपूर्ण आहे. अरविंद व्यं. गोखले (ज्येष्ठ पत्रकार व लेखक)