-
Dayri Apanga Jagrachi (डायरी अपंग जागराची)
डॉ. त्र्यंबक दुनबळे यांनी 'अली यावर जंग' या राष्ट्रीय श्रवण-विकलांग संस्थेत माध्यम अधिकारी म्हणून दोन दशकांपेक्षाही अधिक काळ व्यतीत केला. कामानिमित्तनं त्यांनी मणिपूरपासून अहमदाबादपर्यंत आणि जम्मूपासून चेन्नईपर्यंत देशभर प्रवास केला. त्यातून आलेल्या अनुभवांतून हे पुस्तक आकाराला आलं आहे. मात्र हे केवळ अनुभव नाहीत, हे संशोधनही आहे. शास्त्रीय माहिती आहे. कार्यकर्त्याच्या, संघटकाच्या भूमिकेतून पाहिलेली माणसे, अनुभव आहेत. हे सर्व येतं ते सोप्या, सुलभ भाषेत. अपंगत्व हे पुस्तकाच्या केंद्रस्थानी आहे. अपंगत्वाचे प्रकार आणि व्याख्याही ते सांगतात. त्यांना आवश्यक असणाऱ्या साधनांची, तंत्रज्ञानाची माहितीही ते देतात. विशेषतः कर्णबधिरपणासंबंधी असं विवेचन क्वचितच वाचायला मिळतं.