-
Ekatrit Vichar Karuya (एकत्रित विचार करूया)
शालेय शिक्षणात पाठ्यपुस्तकं शिकवण्या बरोबरच शिक्षक म्हणून आपली जबाबदारी फार मोठी आहे. शिक्षणा बरोबरच मुलांचा एक संवेदनशील, जबाबदार, उत्तम नागरिक म्हणून विकास होण्यासाठी जगण्यातल्या अनेक मुल्यांची त्यांना जाणीव करून देणं, ती मुल्य मुलांमध्ये रुजवणं हे फार महत्वाचं काम शिक्षकांना करायचे असते. नैतिक मूल्याच हे शिक्षण पाठ्यपुस्तकातल्या धड्या सारखं शिकवता येत नाही. आपल्या आसपासच्या घटनांवर मुलांशी संवाद साधून त्यांना आपल्या भवतालचे जग, माणसं,पर्यावरण समजावून घेण्यासाठी शिक्षकांनी मदत करणं अपेक्षित आहे. धर्म म्हणजे काय? प्रगती म्हणजे काय? मन, भावना,विचार यांचा नेमका अर्थ काय? आत्मनिर्भर होणं,वाटून घेण्यातला आनंद घेणं? नातेसंबंध,स्पर्धा,सौंदर्य यांचं जगण्यातलं स्थान काय? या सगळ्या विषयावर अत्यंत सहृदयतेने,विश्वासाने मुलांशी चर्चा करत हे पुस्तक शिक्षक,मुलांना नवा दृष्टीकोन बहाल करते.