-
Man Vs Ocean (मॅन Vs ओशन)
"वैवाहिक आणि व्यावसायिक जीवनात अपयशी, असमाधानी असणार्या अॅडमला आयुष्यात काहीतरी करून दाखवण्याची ईर्ष्या होती. जीवनाला काहीतरी अर्थ द्यायचा होता; पण त्याला त्याचे ध्येय सापडत नव्हते आणि एका विमान प्रवासामध्ये अचानक त्याला ते सापडले. विमानप्रवासामध्ये ‘ ON A CLEAR DAY’ हा एका जलतरणपटूच्या इंग्लंडची खाडी पोहून जाण्याच्या प्रयत्नावर आधारित सिनेमा त्याच्या बघण्यात आला आणि त्याला त्याचे ध्येय सापडले. त्यानंतर इंटरनेटवर शोध घेत असताना ‘स्टीव्ह मुनाटोन्स’ या अमेरिकन जलतरणपटूने त्याच्या ज्ञानाच्या आणि अनुभवाच्या जोरावर निवडलेल्या जगातील सर्वांत अवघड अशा, ज्याची तुलना गिर्यारोहणाच्या क्षेत्रातील सात उत्तुंग शिखरे चढून जाण्याशीच होऊ शकेल, अशा समुद्रातील सात आव्हानात्मक पोहण्याच्या जागांचा त्याला शोध लागला आणि त्याला त्याचे नेमके ध्येय सापडले. ही अॅडम वॉकरच्या जिद्दीची, सात समुद्री साहसांची, उत्कंठावर्धक आणि एक वेगळाच अनुभव देणारी कहाणी आहे."
-
The Eleventh Commandment (द एलेव्हन्थ कंमांडमेंट)
मेडल ऑफ ऑनर विजेता कॉनर फिट्सगेराल्डची ही अफलातून कथा. कुटुंबवत्सल, सच्चा, फिट्सगेराल्ड अठ्ठावीस वर्षे दुहेरी आयुष्य जगतोय. एका निशान्यात लक्ष साधणारा हा सीआयएचा अतिशय तरबेज गुप्त मारेकरी. निवृत्तीच्या उंबरठ्यावर असताना या दुहेरी आयुष्याला निरोप देण्याची स्वप्नं पाहत आहे. पण तेव्हाच त्याची प्रमुख हेलन डेक्स्टर त्याची शत्रू ठरतेय. डेक्स्टरचं सीआयएतलं भविष्य धोक्यात आलं आहे. आणि त्यातून निसटण्याचा एकमेव मार्ग म्हणजे फिट्सगेराल्डचा काटा काढणं. फिट्सगेराल्डला रशियाच्या भावी राष्ट्राध्यक्षांच्या हत्येसाठी नेमलं जातं, पण त्याच मोहिमेत फिट्सगेराल्डचा स्वतःचाच काटा काढण्याची योजना आखली जाते. आणि एक उत्कंठावर्धक नाट्य रंगतं. पानागनिक उत्कंठा वाढवणारं कथानक, दमदार पात्ररचना असलेलं जेफ्री आर्चरचं राजकीय नाट्य.
-
1912 Antarcticachya Shodhat (१९१२ अंटार्क्टिकाच्या
जगभरातील साहसवीरांनी दक्षिण ध्रुवीय प्रदेशात जाऊन नोंदवलेली निरीक्षणे, त्या प्रदेशातील वास्तव्यादरम्यान त्यांना आलेले अनुभव, तेथील प्रतिकूल हवामानाशी झगडताना होणारा प्राणांतिक त्रास, तिथे नेता येऊ शकणारे प्राणी (घोडे, खेचर, कुत्री), त्या प्राण्यांची उपयुक्तता, तेथील वास्तव्यात खाल्ले जाणारे अन्न (व्हेल माशांचे मांस इ.), तेथील बर्फातून मार्गक्रमण करताना वापरली जाणारी साधने, वैज्ञानिक उपकरणे (होकायंत्र, मॅग्नोमीटर इ.), पोषाख , तसेच या मोहिमांदरम्यान काही जणांना पत्करावा लागलेला मृत्यू इ. विषयीRचे उल्लेख म्हणजे ‘१९१२ अंटार्क्तिकाच्या शोधात’ हे पुस्तक. तिथे वापरल्या जाणाऱ्या साधनांमध्ये, पोषाखामध्ये, पादत्राणांमध्ये कालमानाने होत गेलेले बदलही या पुस्तकातून नोंदवले आहेत. एकूणच जगभरातील या साहसवीरांच्या मोहिमांच्या निमित्ताने या प्रदेशाविषयीचा प्रत्येक पैलू उलगडला जातो. संबंधित विषयाची छायाचित्रे, काही नकाशे, साहसवीरांची स्वहस्ताक्षरातील पत्रे, तसेच संदर्भसाधनांचाही समावेश आहे. या मोहिमांमधील थरार आणि साहसवीरांच्या अचाट इच्छाशक्तीचं दर्शन घडवणारं प्रेरणादायक पुस्तक.
-
Origin (ओरिजिन)
गुगेनहाईम वस्तुसंग्रहालयातील एडमंड कर्षचं एक रहस्यमय प्रात्यक्षिक...प्रात्यक्षिकात, निमंत्रितांच्या उपस्थितीत, तो सांगणार असतो मानवाच्या उत्पत्तीसंबंधी आणि मानवाच्या भविष्याविषयी लावलेला शोध... पण तो सांगण्याआधीच कार्यक्रमस्थळी होते त्याची हत्या... हल्लेखोराचं पलायन... तो असतो नौदलातील माजी अधिकारी... कर्षचे गुरू रॉबर्ट लँग्डन आणि वस्तुसंग्रहालयाची मुख्याधिकारी अॅम्ब्रा व्हिडाल (जी स्पेनचे भावी राजे ज्युलियन यांची वाग्दत्त वधू असते) कर्षचा हा शोध जगासमोर आणायचा बांधतात चंग... पण त्यासाठी कर्षच्या महासंगणकाचा पासवर्ड आणि त्या महासंगणकाची जागा शोधण्याचं त्यांच्यासमोर असतं आव्हान... अॅम्ब्राचे सुरक्षारक्षक आणि पोलीस यांचा त्यांच्या मागे असतो ससेमिरा... कर्षच्या खुनाच्या पार्श्वभूमीवर राजवाड्यातून ज्युलियन आणि बिशप वाल्डेस्पिनो गूढ रीतीने गायब होतात...एक जबरदस्त गुंतागुंतीची, उत्कंठावर्धक कादंबरी...