-
Sudmruti Amba (सूडमूर्ती अंबा )
महाभारतातील अंबा प्रकरण हे सुडाचे फार बोलके उदाहरण आहे. तसे पाहिले तर अंबा हि स्त्री आहे. म्हणजेच या प्रसंगी ती उपवर कन्याच आहे. तरीही ज्या जिद्दीने भीष्माचा सूड घेण्याचा तिचा निध्रार आणि त्यानुसार तिने केलेले प्रयत्न पाहिला कि मन थक्क होते. अंबेची सुडकथा म्हणेज एका नामी स्त्रीने एकाकीपने केलेल्या अन्यायविरुद्ध दिलेला लढा आहे. भीष्माचा दरारा आणि अलोकिक पराक्रम विचारात घेता एका असहाय आणि अगतिक स्त्रीने त्याचाविरुद्ध मांडलेल्या हा संघर्ष सामन्य वाटत नाही. भीष्माविरुद्ध या अंबेचा संताप इतका प्रखर होता कि, त्याचा सूड घेणाव्यक्तीरीक्ति तिने आयुष्यात इतर कसलेच चिंतन आणि चिंता केली नाही आहे. भीष्माचा सामर्थ्यासमोर आपण किती नगण्य आहोत याची तिला यर्थाथ जाणीव होतीच. तरीही अंबा स्वस्थ बसेलेली नाही....