-
The Making Of Star India (द मेकिंग ऑफ स्टार इंडिया
१९९०च्या सुरुवातीला रिचर्ड ली यांच्याकडून रुपर्ट महोक (कार्यकारी अध्यक्ष, न्यूज कॉर्पोरेशन) यांनी स्टार टीव्ही ही कंपनी ८७० मिलियन डॉलर एवढी अवाढव्य रक्कम खर्च करून विकत घेतली, तेव्हा जगभरातील माध्यम तज्ज्ञांच्या भुवया उंचावल्या होत्या. कसलंही निश्चित भवितव्य किंवा ओळख नसलेल्या आशियातील या कंपनीमध्ये मर्डोक यांनी इतकी प्रचंड गुंतवणूक का केली असेल? आज २५ वर्षांनंतर ‘स्टार इंडियाचा महसूल २ अब्ज डॉलरपेक्षाही जास्त आहे. आज ‘स्टार इंडिया’ भारतातील तीन प्रमुख प्रसारमाध्यम कंपन्यांपैकी एक आहे. शेकडो गुंतवणूक तज्ज्ञांना जे जमलं नाही; ते मर्डोक यांच्या अंतःप्रेरणेनं घडवून आणलं होतं! आणि भारतातील प्रचंड मोठ्या बाजारपेठेची ओळख रुपर्ट मर्डोक यांच्यामुळे जगाला झाली! वनिता कोहली-खांडेकर यांनी भारतीय प्रसारमाध्यमांच्या क्षेत्रातील प्रमुख खेळाडू असलेल्या ‘स्टार टीव्ही’ची ही रोमांचक कथा या पुस्तकामध्ये चितारली आहे. मुळात अत्यंत उत्कंठापूर्ण अशी कथा अतिशय रोचक किस्से आणि रतिकांत बासू, पीटर मुखर्जी, उदय शंकर, समीर नायर आणि खुद्द रुपर्ट मर्डोक यांच्या व्यक्तिरेखांमुळे अधिकच उठावदार झाली आहे.