-
Antaralatil Gammat Jammat (अंतराळातील गंमत जंमत)
भारताने मंगळावर यान पाठवून अवकाश संशोधन क्षेत्रात एक महत्त्वाची कामगिरी केली. या ऐतिहासिक घटनेची नोंद समस्त जगाने घेतली आहे. अंतराळातील घटना, आश्चर्य यांचे कुतूहल मानवाला नवनिर्मितीची प्रेरणा देत असते. अंतराळ हा घटक पूर्वीपासूनच मानवी मनाचा एक अकल्पित गाभा आहे. प्रत्येकजण अंतराळात फेरफटका मारण्याचा विचार करत असतो आणि अंतराळाविषयी जाणून घेण्यास उत्सुक असतो. अंतराळातील अशाच काही रंजक व ज्ञानवर्धक विविध घटना व यानांच्या कार्याची माहिती प्रस्तुत पुस्तकात दिली आहे. विज्ञानप्रेमी वाचकांसाठी या पुस्तकातील कथांचा आस्वाद जणू एक पर्वणीच आहे.
-
Aarogyache Gupit (आरोग्याचे गुपित)
अवघ्या मनुष्याची धडपड असते ती सुखी जीवन जगण्याची,प्रत्येकाची सुखाची कल्पना वेगवेगळी असली तरी सुखी जीवनाची प्राथमिक अट म्हणजे आरोग्यपूर्ण जीवन. आरोग्यपूर्ण जगण्यासाठी फार मोठ्या ग्रंथ अभ्यासाची गरज नसून छोट्या छोट्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या व पाळल्या तर आपण सहजपणे आपले आयुष्य आरोग्यपूर्ण जगू शकू असा विश्वास निर्माण करणारी हि काही टिपणे...