-
How To Control the Uncontrollable (हाऊ टू कंट्रोल अनकन्ट्रोलेबल)
“आपल्या नियंत्रणाबाहेरच्या गोष्टींना आपण जितकं जास्त महत्त्व देतो, तितकं आपलं नियंत्रण कमी होतं.” – एपिक्टेटस आयुष्यात कठीण प्रसंग येणार, हेच माणूस असण्याचं वास्तव आहे. पण त्यांना अधिक मजबूतपणे सामोरं जाण्याचा काही मार्ग असेल तर? तो मार्ग आहे, स्टोईक तत्त्वज्ञान ही प्राचीन ग्रीक विचारसरणी आजही तितकीच उपयुक्त आहे, जितकी ती दोन हजार वर्षांपूर्वी होती. याचा मूलभूत उद्देश एकच आहे तो म्हणजे, आपल्याला अधिक चांगलं आयुष्य जगायला मदत करणं. स्टोईक तत्त्वज्ञानाचं सूत्रमंत्र सांगतो: “आपण बाह्य घटनांवर नियंत्रण ठेवू शकत नाही, पण त्यांना कसा प्रतिसाद द्यायचा हे मात्र आपण ठरवू शकतो.” व्यावहारिक तत्त्वज्ञ आणि सल्लागार व्यक्तिमत्त्व बेन ऑल्ड्रिज स्टोईक विचारांतील १० महत्त्वाच्या तत्त्वांद्वारे तुम्हाला अधिक लवचिक, संतुलित आणि समृद्ध जीवन कसं घडवायचं हे शिकवतील. हे पुस्तक केवळ विचार करण्यासाठी नाही, तर कृती करण्यासाठी आहे. बेन तुम्हाला काही आव्हानात्मक पण उपयुक्त सरावही सुचवतात, ज्यामुळे तुम्ही स्टोईक तत्त्वज्ञान प्रत्यक्षात उतरवू शकता. जसे की, • स्वतःची अँटी-बकेट लिस्ट तयार करणं • जाणूनबुजून थोडंसं अस्वस्थ अनुभव घेणं • निःस्वार्थी दृष्टीकोन विकसित करणं • स्वतःच्या मृत्यूचा विचार करणं (मेमेंटो मोरी) “तुमचं नियंत्रण तुमच्या मनावर आहे-बाह्य घटनांवर नाही. हे ओळखा, आणि तुम्हाला तुमच्यातील खरी ताकद सापडेल. – मार्कस ऑरेलियस”
-
Yashodhara (यशोधरा)
या कांदबरीत गौतम बुद्धाच्या प्रत्यक्ष आयुष्यातल्या अशा काही रिकाम्या जागा अत्यंत कल्पकतेने आणि काही तीव्र भावनिक प्रसंगांच्या, भावनिक संघर्षांच्या आधाराने भरून काढण्यात आल्या आहेत. सिद्धार्थला एका वाटिकेत भेटलेली ही तरुणी कोण होती आणि जगाकडे पाहण्याचा तिचा दृष्टिकोन कशामुळे बदलत गेला? वयाच्या सोळाव्या वर्षी तिने सिद्धार्थशी विवाह केला. त्या वेळी तिला कल्पना तरी होती का की, अगदी थोड्याच काळानंतर तिचं वैवाहिक आयुष्य एक अगदी संपूर्ण अपरिचित असं वळण घेणार आहे? या स्त्री-पुरुष समान नात्याचा पुरस्कार करणार्या कादंबरीतून आपल्याला भेटणारी यशोधरा ही बुद्धिमान आणि दयाळू वृत्तीची आहे आणि आध्यात्मिक बाबतीतलं ज्ञान पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियांनाही मिळायला हवं, हा विचार समाज मनात रुजवून स्त्रियांना त्या वाटा मोकळ्या करून देण्याचा ध्यास तिच्या मनाने घेतलेला आहे.
-
The Happiness Story (द हॅप्पीनेस स्टोरी)
सर्वोत्तम जीवन जगण्याचं रहस्य उलगडणारं पुस्तक - आनंद हे दूरचे स्वप्न नसून तुमच्या आवाक्यात असलेली निवड आहे. भीतीदायक जगामुळे निराश होण्याची गरज नाही. कारण त्याचा सामना करण्याचा प्रभावी मार्ग उपलब्ध आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून तुम्हाला तो मिळवता येईल. हे पुस्तक तुम्हाला तुमच्या आवडी जोपासण्यासाठी, महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी, स्वतःचं नशीब स्वतःच लिहिण्यासाठी प्रेरित करेल. परिस्थिती काहीही असो, या पुस्तकात दिलेले व्यावहारिक सल्ले तुम्हाला दररोज आनंद आणि शांततेचा अनुभव देतील. 1) आपली दैनंदिन जीवनशैली कशी आखावी ? 2) स्वतःची काळजी घेणं 3) कृतज्ञता 4) इच्छा-आकांक्षा आणि यातना यांचं चक्र 5) आनंदाच्या बाबतीतलं सत्य 6) स्वतःच्या बाबतीतली जागरूकता
-
Jinkeparyant Ladha (जिंकेपर्यंत लढा)
‘‘माझा असा ठाम विश्वास आहे की, सर्वसाधारणपणे ज्या गोष्टी लोकांना अशक्य कोटीतल्या वाटत असतात, त्या खरं तर वास्तवात उतरवता येतात. मात्र त्यासाठी अपार मेहनत करण्याची तुमची तयारी हवी. समस्यांचं तुम्ही अवडंबर माजवलं नाही तर संधी बनून त्या तुमच्यापुढे येतात.’’ ‘‘ज्या ज्या वेळी नाही किंवा नको, या नकारघंटा मला ऐकू येतात, त्या वेळी त्यांचा नाद मी माझ्यासमोरचं आव्हान समजतो.’’ याचा मला असा फायदा झाला की, 1990 मध्ये माझं नाव ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्’ मध्ये नोंदवलं गेलं. अन् तेही आजवरच्या इतिहासात कुणी कधी मिळवला नसेल इतका भरगच्च नफा मिळवण्यासाठी. माझे अनुभव आणि जिंकेपर्यंत लढण्यासाठी वापरलेली शस्त्रे या पुस्तकरुपाने मांडली आहेत. * निराशेच्या क्षणांवर मात * अपयश कायमस्वरूपी नसतं * धाडस म्हणजे भीतीवर विजय * समस्यांमधल्या संधी शोधा * तोट्यातील व्यवसाय त्वरित बंद करा * 6 वर्षांचा प्रकल्प 6 महिन्यांत * कधीतरी नवीन सुरुवात करावीच लागते * फजितीचे प्रसंग * अल्पसंतुष्ट राहू नका * बदलाला विरोध हा होतोच * फ्रेड ट्रम्प यांची ‘यशाची चतुःसूत्री’ * स्वतःचे गुण लोकांपुढे मांडण्याची कला * हल्ला करणार्यांना धडा शिकवा * आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यवसायाचा विचार करा * इतरांची हार, तुम्हाला संधी