-
Shrimant Peshwe (श्रीमंत पेशवे )
अटकेपार भगवा झेंडा फडकविणाऱ्या पेशव्यांची शौर्यगाथा "श्रीमंत पेशवे' या पुस्तकात लक्ष्मण सुर्यभान यांनी रेखाटली आहे. श्रीमंत बाळाजी विश्वनाथ पेशवे, श्रीमंत बाजीराव पेशवे, माधवराव पेशवे, दुसरे बाजीराव पेशवे यांच्याविषयी लेखकाने उत्कटपणे लिहिले आहे. थोरल्या बाजीराव पेशव्यांचा शूरपणा, धाडसीपणा याचबरोबर मस्तानीबरोबरचे प्रेमसंबंध लेखकाने उत्तमरीत्या फुलवले आहेत. प्रवाही भाषाशैली व जमून गेलेले प्रसंग यामुळे या पुस्तकाने एक वेगळी उंची गाठली आहे, यात शंका नाही.