-
Kya Haal Sunava (क्या हाल सुनावॉ)
डॉ. नरेन्द्र मोहन यांच्या आत्मकथेची ही पुढील कडी ‘स्व’च्या परिघात फिरणारी - त्यांच्या वैयक्तिक जीवनातली सुख-दु:खे-कटुता - समाज आणि राजकारणातल्या कठीण प्रश्नांचा ऊहापोह - सखोल आत्मविश्लेषण - दोन आणीबाणींमधल्या कालखंडाचे चित्रण – बालपण-तारुण्य-दुसऱ्या आणीबाणीपर्यंतचा वैयक्तिक-कौटुंबिक त्रास आणि तणाव – दहशतमय वातावरणात सुन्न झालेला देश या सोबतच त्यांच्या आयुष्यातल्या व्यक्ती, प्रसंग घटना, प्रवास आणि आठवणींची शृंखला - सुख आणि दु:ख, आनंद आणि वेदनेचीही शृंखला काल-यात्रीची साथ करत स्मृतींच्या अवकाशात भरारी घेते. ‘कमबख्त निंदर’मधला निंदर इथेही आहे; परंतु तो लपाछपी खेळतो आणि प्रश्नात टाकत जातो. या सगळ्या भावानिक गदारोळात डॉ. नरेन्द्र मोहन यांचे आंतर-बाह्य होणारे हाल अंतर्मन पोखरतात. सर्वांनी निश्चितच वाचावी अशी एक उत्कृष्ट आत्मकथा आपल्या भेटीला! "
-
Apurva Aloukik Ekmev (अपूर्व अलौकिक एकमेव)
महान अभिनेत्री आणि माणूस म्हणूनही मोठ्या असणाऱ्या सुलोचनाबाई, अभिजात कविता लिहिणारी बाल कवयित्री समृद्धी केरकर, अभिनेत्री-लेखिका प्रिया तेंडुलकर, सामाजिक जाणीव असलेले, धडपडे नरेंद्र काटकर (यशोधराताईंचे वडील), लग्नानंतरही यशोधराताईंच्या शिक्षणाला पाठिंबा देणारे त्यांचे सासरे गजानन भोसले, साहित्य-कला क्षेत्रातील लोकांशी नातं जुळवायला शिकवणारे थोर साहित्यिक रणजित देसाई, एक मनस्वी कलावंत आणि तेवढाच मनस्वी माणूस डॉ. काशिनाथ घाणेकर, अतिवास्तववादी कथाविश्वातून भेटणारा राही अनिल बर्वे, अभिनेता प्रशांत दामले आणि त्यांचे कुटुंब...या आणि अन्य व्यक्तिरेखांचे अंतरंग आणि बहिरंग सूक्ष्मतेने उलगडणारा, यशोधरा काटकरांच्या लेखणीतून उतरलेला व्यक्तिचित्रसंग्रह.
-
Kanbakth Nindar (कमबख्त निंदर)
साहित्यिक नरेन्द्र मोहन यांची ही आत्मकथा त्यांचं लौकिक, व्यावसायिक जीवन उलगडते. आई-वडील, दोन भाऊ अशा कुटुंबासमवेतचं बालपण...तेराव्या वर्षी फाळणीमुळे अमृतसरला निर्वासितांच्या छावणीत स्थलांतर...या घटनेने बदललेले आयुष्य आणि भावविश्व...अर्थात हा प्रवास ते चित्रित करतात निंदर (त्यांची आई त्यांना लाडाने ‘निंदर’ असं म्हणत असे) या व्याQक्तरेखेच्या माध्यमातून...त्यांच्या मनाला पडलेला पीळ, अस्वस्थता व्यक्त करताना ते निंदरचा आधार घेतात आणि या आत्मकथेला कलात्मकतेच्या पातळीवर नेऊन ठेवतात...निंदर ते साहित्यिक नरेन्द्र मोहन हा महत्त्वपूर्ण प्रवास यात येतो...फाळणीच्या आणि १९७५च्या आणीबाणीच्या वेदना या आत्मकथेतून जाणवतात...लौकिक आणि व्यावसायिक जीवनातील वादळांचा, आनंदक्षणांचा, त्या त्या वेळच्या राजकीय, सामाजिक परिस्थितीचा अभ्यासपूर्ण, व्यामिश्र आविष्कार