- 
                                    
Moonrekar
बॉँड बोलायचं थांबला. या जगावेगळ्या माणसाची कहाणी सांगता सांगता जणू त्याचं भान हरपलं होतं. "होय," एम् म्हणाले. "ते बातम्यांचे मथळे मला चांगलेच आठवतात. शांततेची हमी - मूनरेकर ! आपलं स्वत:चं क्षेपणास्त्र आता जवळ जवळ तयारही झालंय. मूनरेकरच्या क्षमतेबद्दल ह्यूगो ड्रॅक्सला प्रचंड आत्मविश्वास आहे. त्याचा दावा खराही असेल. तरी पण फारच विचित्र..." एवढं बोलून ते खिडकीबाहेर पाहात गप्प बसून राहिले. थोड्या वेळानं त्यांनी नजर आत वळवली आणि ती बॉंडवर खिळवत ते सावकाश म्हणाले, "फारच विलक्षण कहाणी आहे. मनुष्य मुलखावेगळाच दिसतो." ते पुन्हा बोलायचं थांबले. थोडा वेळ विचारात गढून गेले. "आणखी एक गोष्ट आहे..." एम् हातातील पाईप विमनस्कपणे दातावर वाजवत राहिले. "कोणती, सर ?" बॉंडनं विचारलं. एम्नी शेवटी मनाची तयारी केली असावी. काहीशा थंड नजरेनं त्यांनी बॉंडकडे पाहिलं. "क्लबमध्ये खेळताना..." त्यांचा आवाज कमालीचा गंभीर झाला होता, "...सर ह्यूगो ड्रॅक्स पत्त्यांमध्ये फसतात."