-
Hindudharm :Chikitsa Tatvik Parichay (हिंदुधर्म :
हिंदुधर्म हा जगातील एकमात्र तत्वज्ञानात्मक धर्म आहे. ज्या मुलभूत सिद्धांतावर ह्या महान धर्माची उभारणी झाली. ते सिद्धांत अनेक आधुनिक शास्त्राच्या कसोटावरही टिकणारे आहेत. आधुनिक विज्ञायुगात धर्मविचार कालबाह्य झाला असे. काही लोक समजत असले तरी हिंदूधर्माला लागू होत नाही. विज्ञानाची वाटचाल हिंदूधर्माचा काही मुलभूत सिद्धांतच्या दिशेने चालली आहे. आधुनिक विज्ञानाचे आव्हान हिंदुधर्मापुढे नाही. कारण हिंदुधर्म विज्ञानविरुद्धी नाही. तो विज्ञानाचा कक्षापुढे नेणारा आहे. तर्कशास्त्र, वैज्ञानिक कार्यपद्धती व सिद्धांतकल्पना, परामानसशास्त्र व इतिहासलेखनशास्त्र अशा अनेक आधुनिक शास्त्राचा आधारावर हिंदूधर्माचा मुलभूत सिद्धांताची सविस्तर चर्चा करून या ग्रंथात हिंदुधर्माचा भावी काळाचा विश्वधर्म होण्याचा योगतेचा कसा आहे ह्याचे विवेचन करण्यात आले आहेत. त्यासाटी इतर प्रचलित धर्माचा तुलनात्मक विचार करण्यात आला आहे. चार पुरुषार्थ, चार आश्रम, हिंदूचा मुलभूत श्रद्धा व हिंदू समाजाची अंगभूत राष्टीय एकात्मता हे महत्वाचे विषय सदर ग्रंथात हाताळत आले आहेत. मानवाला ऐहिक सुख व पारमार्थिक कल्याणचा मार्ग दाखविणारा हिंदुधर्म हा परतत्वाचा अखंड शोध आहे. व म्हणूनच त्याचे स्वरूप मुक्त व मूलगामी आहे हे सदर ग्रंथात दाखविण्यात देण्यात आले आहेत.