-
Rujwai (रुजवाई)
नकळत्या वयात संजूला हेतुतः दुर्लक्षित करणाऱ्या मानसीची योगायोगाने त्याच्याशी भेट होते आणि जुन्या ‘ऋणानुबंधा’ची जाणीव ठेवत त्याने केलेली पाठराखण तिला स्पर्शून जाते. मुकुंदाची आई ही प्रतिकूल परिस्थितीशी झगडून मुलाला मोठे करते; पण सून आल्यावर या आईवर बेघर होण्याची वेळ येते; मात्र तिचा कसा कायापालट होतो, ते सांगते ‘कायापालट’ ही कथा. ‘नातिचरामि’ कथेतील माधवीने एका कलंदर कलाकाराच्या प्रेमात पडून पस्तीस वर्षे त्याला मनापासून साथ दिली. आयुष्याच्या उतरणीवर त्यानेही खुल्या मनाने त्याचे श्रेय तिला दिले, पण एक अबोध अदृश्य सल तिला सतत खुपत होता... मानवी भावना व नातेसंबंधाच्या मनोहारी अनुबंधाचं मनोज्ञ दर्शन घडविणाऱ्या कथांचा संग्रह ‘रुजवाई’...