-
George Orwell (जॉर्ज ऑर्वेल)
जॉर्ज ऑर्वेल ‘१९८४’ आणि ‘अॅनिमल फार्म’ या कलाकृतींनी जागतिक साहित्यात मोहर उमटवणारा निर्भीड कादंबरीकार. धारदार, तर्कशुद्ध आणि स्फटिकशुभ्र भाषेत लिहिणारा निबंधकार. हुकूमशाही आणि साम्राज्यशाहीचा कट्टर विरोधक. अनुभवांच्या शोधात बेघर फिरस्त्यांसोबत राहणारा मानवतावादी. जिवावर उदार होऊन लढणारा शूर सैनिक. हळव्या मनाचा बाप. हा मनस्वी लेखक कसा जगला? त्याचे सार्वकालिक ठरलेले विचार कोणत्या विलक्षण अनुभवांच्या मुशीतून घडले? कोणत्या विचारांचं बीज पेरत होता तो? त्याच्या आयुष्याची आणि साहित्याची ही कहाणी – जॉर्ज ऑर्वेल
-
Savadh Aaika (सावध ऐका)
कितीही वाटले, तरी आपले शेजारी बदलता येत नाहीत. पाकिस्तान आणि चीन... हे आपले दोन सख्खे शेजारी देश. अगदी सुरुवातीपासूनच आपल्याला पाण्यात पाहणारे, आपल्याशी लढून हरवायची खुमखुमी बाळगणारे आणि भल्याबुऱ्या मार्गांनी सतत आपल्या कुरापती काढणारेदेखील! जागतिक महासत्ता बनण्याच्या मार्गावर वेगाने झेपावणारा चीन आणि भारतद्वेषापायी कोणत्याही थराला जाऊ शकणारा पाकिस्तान हे दोन देश संगनमताने आपल्याला आव्हान देऊ पाहात आहेत. त्या दोघांच्या व्यूहरचनेचा दीर्घकालीन आढावा घेणारे हे पुस्तक प्रत्येक देशप्रेमी नागरिकाला सावधानतेचा अगदी समयोचित इशाराही देत आहे...
-
Culture Shock Aakhati (कल्चर शाॅक-आखाती)
आपल्या सर्वामध्ये हे असं लहानग मूल कायम दडलेलं असत. एखादा अनपेक्षित अनुभव आला कि ते डोळे विस्फारत. एखादा परक्या भूमीवर पाय ठेवला कि सुरुवातीचा काळात तर आपले डोळे सदेव विस्फारलेलेच. 'आखाती देशात जाताय ? या देशाबद्दल तर बरंच काही उलटसुलट ऐकलंय. तिकडेच अनुभव कसे असतील? तिथला कट्टर संस्कृतीशी अन कठोर कायद्याशी मला जुळवून घेत येईल ना? अरब व्यक्तीशी मी कस वागायला हवं? ते लोक माझाकडे कसे बघतील?' असे अनेक सतावणारे प्रश्न. थांबा, आता तुम्ही एकटे नाहीत. तुमचा सोबतीला असेल आधार देणार, हलक्या - फुलक्या प्रसंगा मधून अरब संस्कृतीमधील बारकावे उलगडणार हे पुस्तक. त्याचा स्मितहास्याचा बुराकाआड दडलेला संस्कृतीला जीवनप्रवास सुखकारक करणारं 'कल्चर शॉक : आखाती देश'