-
Bilwapatra (बिल्वपत्र)
इष्टमित्राचा प्रेमाचा महिमा काय वर्णावा? तो तर माझासारखाच पेन्शनिवर निघाला. गोतावळ न भूतावालीसारखीचा! "टाकतील शीत तर दिसतील भूत!" असा पूर्वी नेम होता. म्हणून सारी गोतावळ भोवती गोल होत होतं. पण आता? आता शीत संपलीत, भूतही पांगतील !! पांगोत बापुडी! शेवटी... "एकाला चलो रे!" त्या म्हात्माचे बोल मनी ठसवून वाटचाल करतो आहे. कुठे? केव्हा? आणि कशी संपेल हे मात्र अजून मला कळाल नाही आणि आता कळूसुद्धा नये. कळून तरी काय उपयोग? तेलाचा घाण्याला झापडं लावलेल्या बैलाला आपण किती चालतो आहोत. हे जस कळत नाही तसच प्रपंचाचा घाण्याला मी एक! चालतोच आहे वाट!