-
Mrutyunidra (मृत्युनिद्रा)
आणि त्या प्रेताने हालचाल केली. त्याने खाडकन डोळे उघडले. विजयची बोबडीच वळाली. प्रेताची नझर थेट विजयवर खिळली होती. ती नजर विषारी, विखारी, दाहक आणि निव्रेध होती. वटारलेले डोळ्यातील रक्तावर्णी रेषा ठळकपणे नजर भिडवन विजयचा अलम दुनियेतील कुणाचाही आवाक्याबाहेरील गोष्ट होती. प्रेताच्या नजरेतील दाहक विखार. विजयच्या अंगागात दाह उठवून गेला. ज्याअर्थी ते कोणत्याही क्षणी कोणतीही हालचाल करू शकत होतं. अशा अघोरी, भयंकर शक्तीशी लढण्याचा अनुभव विजयला नव्हता.
-
Chakravyuh (चक्रव्यूह).
चक्रव्यूह इरेना त्याच वेगाने फेकली जात होती; धुमसत होती. परिघाच्या कोणत्याही बिंदुतून निसटण्याचा पुसटसा प्रयत्नजरी केला तर राजा मानसिंग स्वताचा त्रिज्येने परिघाचा त्या बिंदुला स्पर्शत होता.या चक्रव्यूहाचा जनक राजा मानसिंग होता.तो सर्वव्यापी झाला होता. इरेनाला तिचा दोन्ही मेगीनोको या व्युहामध्ये आणून अडकवलं होतं.आफ्रिका,भारत,नायजेरिया अशा देशामधून बळी देण्याची परंपरा आहे असे इरेना ऐकून होती. बळी हि संकल्पना आता आपल्यासाठी सार्थ ठरलीय. असे इरेनाला वाटू लागल आहे. स्वत इरेनाला चक्रव्यूह भेदता येत नव्हत. मानसिंग तिला चक्रव्युहाबाहेर पडू देत येत नव्हता. इरेना बाहेरून मदत मागवू शकत नव्हती. आता आशेचा एकाचा किरण होता...