Sarvansathi Pranayam
नाडीशुद्धी प्राणायामास प्राणयमांचा राजा म्हटले जाते. संपूर्ण लक्ष श्वसनाकडे, श्वसनाच्या प्रमाणाचे पालन केल्याने, प्राणधारणा झाल्याने बाहेरील वातावरणातून येणारया संवेदेनांकडे लक्ष जात नाही. मन आत वळून एकाग्र झाले की शरीराच्या आतील भागाकडून येणारया संवेदना जाणवू लागतात . अशावेळी बौद्धिक विश्लेषणाचे काम अहंकाराशी संबंधित असणारे विचार प्रवाह संपतात. मन शांत शिथिल होते, स्थिर होत जाते. मनातील खळबळ, चिंता, अस्वस्थता कमी झाल्याने भावनांचा प्रकोप व ताण नाहीसा होतो. व्यक्तिमत्व विकसित होऊन पुर्णत्वाकडची वाटचाल विकसित होऊ लागते. ध्यानासारख्या प्रगत तंत्राची पूर्वतयारी म्हणून या अभ्यासाचा उपयोग होईल.