-
Numbers (नंबर्स)
नंबर्स हे पुस्तक गणितात स्वारस्य असणाऱ्याांशिवाय सर्वसामान्य वाचकांनाही रोचक वाटेल. गणितप्रासादाच्या विटा संख्या’ना मानलं गेलं तर नवल नाही। प्रस्तुत पुस्तक सर्वच वाचकांचे गणितरंजन करेल ह्यात शंका नाही! – डॉ. रोहित दिलीप होळकर सहयोगी प्राध्यापक, गावित विभाग, आपत्तर भोपाल सदर पुस्तक हे मराठी भाषेतील दर्जेदार पुस्तक आहे. शास्त्रीय विचार मराठी भाषेत चागल्या पद्धतीने मांडता येतात, याचकांपर्यंत पोहोचवता येतात हे या पुस्तकावरून लक्षात येतं. – डॉ. दिलीप नारायणदास शेठ (निवृत्त) प्राचार्य, सर परशुरामभाऊ महाविद्यालय, पुणे ‘नंबर्स हे पुस्तक गणिताविषयी कुतूहल असणाऱ्या सर्व मराठी वाचकांनी वाचावं, संग्रही ठेवावं, आणि आपल्या मुलांना, नातवंडांना या पुस्तकाचा परिचय करून द्यावा असं मला मनापासून वाटतं. – डॉ. शैलजा देशमुख संख्याविभामुख (निवृत्त), सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे
-
Statistics Sankhyashastra (स्टॅटिस्टिक्स संख्याशास
पुराणकाळापासून स्टॅटिस्टिक्स रोजच्या व्यवहारात कळत-नकळतपणे वापरलं जात आहे. आजच्या डेटा सायन्सच्या काळात तर त्याचं महत्त्व अनेक पटींनी वाढलेलं आहे. स्टॅटिस्टिक्स हा डेटा सायन्सचा आत्मा आहे, असं म्हणायला हरकत नाही. कारण कॉम्प्युटरवर काम होत असलं तरी मूळ संकल्पना स्टॅटिस्टिक्समधल्याच असतात. स्टॅटिस्टिक्सचा आपण जगत असलेल्या विश्वाशी, माणसांशी घनिष्ठ संबंध असतो. कारण यात लागणारा डेटा हे विश्व, त्यातली माणसं आणि त्यांची माहिती याविषयीचा असतो. अशा डेटाची मांडणी, विश्लेषण आणि त्यातले परस्परसंबंध कसे ओळखायचे हे सगळं स्टॅटिस्टिक्समध्ये येतं. आर्टिफिशियल इंटेलिजंसमधलं जे मशीन लर्निंग आहे, त्यात मोठा डेटाच इनपुट म्हणून द्यावा लागतो. त्यामुळे त्यातही स्टॅटिस्टिक्स लागतंच. स्टॅटिस्टिक्सला आजचं स्वरूप कसं प्राप्त झालं, त्याचा इतिहास, त्यातल्या संशोधकांचे संघर्ष, त्यांच्यातले वादविवाद, तसंच प्रॉबॅबिलिटी ही संकल्पना जुगारातून कशी निर्माण झाली, तिच्या विकासाचे टप्पे हे सगळं मनोरंजक पद्धतीनं यात लिहिलं आहे. कोणत्याही क्षेत्रात स्टॅटिस्टिक्स वापरायचं असेल, तर त्यातली मूलतत्त्वं समजली पाहिजेत. इथे ती सोप्या पद्धतीनं सांगितली आहेत. त्यामुळे फक्त स्टॅटिस्टिक्सचेच नव्हे, तर इतर विषयाचे विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांनी हे पुस्तक आवर्जून वाचावं. नोकरी व्यवसायात स्टॅटिस्टिक्स किती महत्त्वाचं आहे, याचं भान विद्यार्थी आणि पालकांना यावं याची काळजी या पुस्तकात घेतली आहे. तांत्रिक गोष्टी आवश्यक तेवढ्याच घेऊन सोपेपणा आणि रंजकतेला प्राधान्य दिलं आहे. तसंच स्टॅटिस्टिक्सची भीती कमी होऊन कुतूहल वाढावं या उद्देशानं हे पुस्तक लिहिलं आहे. हे पुस्तक लोकांनी कादंबरीसारखं वाचावं.
-
Sharir (शरीर)
शरीर ‘वैद्यकशास्त्र हा अत्यंत कठीण समजला जाणारा विषय सर्वसामान्यांना समजण्यासाठी आपल्या बोलीभाषेत सांगणारं हे पुस्तक सर्वांनाच उपयुक्त ठरणार आहे.’ - डॉ. विठ्ठल लहाने, सुप्रसिद्ध प्लॅस्टिक सर्जन. ‘मानवी शरीर प्रणाली, त्याची रचना व कार्य हे अत्यंत जटिल आणि समजून घेण्यास कठीण आहे. यातून सर्वसामान्यांच्या मनातील असंख्य प्रश्नांचे निरसन होईल.’ - डॉ. अविनाश सुपे, डीन, केईएम हॉस्पिटल. ‘शरीर हे पुस्तक वाचणं म्हणजे शरीरविज्ञानाच्या क्षेत्रात मुशाफिरी घडवून आणणारा आणि मनाला उल्हासित करणाऱ्या तरल सिंफनीसारखाच अनुभव आहे.’ - डॉ. नंदकुमार, सुप्रसिद्ध हृदयशस्त्रक्रिया तज्ज्ञ. ‘प्रत्येकानं ‘शरीर’ हे अद्भुतरम्य पुस्तक वाचणे आणि संग्रही ठेवणे अगत्याचे आहे, या पुस्तकामुळे आपल्याला आपल्यातल्या अणूरेणुला ओळखण्यासाठी मोलाची साथ लाभणार आहे.’ - डॉ अनिल गांधी, सुप्रसिद्ध सर्जन. ‘ग्रामिण भागातून मेडिकलचं शिक्षण घ्यायला येणाऱ्या आणि इतरही सगळ्याच विद्यार्थ्यांना शरीरक्रियाशास्त्र हा विषय समजण्यासाठी ‘शरीर’ हे पुस्तक खूपच मदत करेल असं मला वाटतं.’ - डॉ. अजित भागवत, सुप्रसिद्ध हृदयक्रियातज्ज्ञ ‘अत्युकृष्ठ! हे पुस्तक वाचताना आपण प्रत्येक अवयवसंस्थेच्या आत जाऊन प्रत्यक्ष अनुभवतोय असंच वाटत राहतं.’ - डॉ. विवेक नळगिरकर ‘जनांसाठी असलेलं हे ‘शरीर’ इतिहास आणि शरीर विज्ञान यांची गुंफण करून आपल्याला वेगळ्याच विश्वात घेऊन जाते. आपण स्वतःला नव्याने ओळखायला लागतो.’ - डॉ. शंतनू अभ्यंकर
-
Sukshmajantu (सूक्ष्मजंतू)
सिध्दहस्त लेखक अच्युत गोडबोले आणि डॉ. वैदेही लिमये यांच सूक्ष्मजंतू सर्वसामान्य वाचकालादेखील समजेल अशा सहज सोप्या शैलीतून साकार झालेल अतिशय सुंदर पुस्तक आहे. सूक्ष्मजंतूंचा इतिहास, विज्ञान आणि मानवी संस्कृतीवेर पडलेला प्रभाव यांचा धांडोळा घेताना लेखकव्दयींनी अतिशय परिश्रम घेऊन प्राचीन काळापासून ते २१ व्या शतकापर्यंतच्या जंतुविज्ञानाचा सखोल आढावा घेतला आहे. साथीच्या रोगांच्या मुळाशी जाऊन सूक्ष्मजंतूंचा वेध घेणार्या, त्यावर लस शोधून काढणार्या शास्त्रज्ञांच्या चरित्रकथांनी नटलेल हे पुस्तक वाचकाला गोष्टीच पुस्तक वाचल्याचा आनंद देत.
-
Vitamins (व्हिटॅमिन्स)
संशोधनात वापरण्यात येणार्या सर्व शास्त्रीय पध्दतींचा या पुस्तकात मागोवा घेण्यात आला आहे. पाश्चिमात्य परंपरा व भारतीय परंपरा यांचे दाखले दिल्यामुळे हे लिखाण आकर्षक झाले आहे. पोषण, आहार व निकृष्ट शरीर यांचा संबंधही प्रस्तुत पुस्तकातील विविध प्रयोगांमुळे सिध्द झालेला दिसून येतो. आहारातील प्रत्येक व्हिटॅमिन्सचे कोणते पदार्थ किती प्रमाणात घ्यावेत, न घेतल्यास होणारे दुष्परिणाम यांची सविस्तर माहिती या पुस्तकाद्वारे मिळते.
-
Artificial Intelligence (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स)
आर्टिफिशियल इंटेलिजन्स १९५० च्या दशकांपासून बघितलं गेलेलं आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं स्वप्न अनेक खाच खळगे पार करत मशीन लर्निंग, डीप लर्निंग, न्यूरल नेटवर्क्स, नॅचरल लँग्वेज अशा अनेक तंत्रज्ञानांच्या मदतीनं आता पूर्णत्वास येतंय. कला क्षेत्रासकट सगळ्या क्षेत्रात धुमाकूळ घालायला ते आता सज्ज झालंय. या कल्पनेमागचा इतिहास, वेगवेगळ्या तंत्रज्ञानांची ओळख, त्याचे उपयोग, त्याचे भविष्यात होणारे विपरीत परिणाम, UBI या सगळ्याचा वेध घेणारं पुस्तक म्हणजे ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’
-
Sajeev (सजीव)
सजीवांच्या उत्पत्तीपासून, उत्क्रांतीपासून ते बायोटेक्नॉलॉजीपर्यंत आणि जेनेटिक्स पासून ते बायोटेक्नॉलॉजीपर्यंत जीवशास्त्राचा विकास कसा होत गेला याची मनोहारी कहाणी सांगणारं आणि जीवशास्त्राचा इतिहास, त्यातल्या संकल्पना आणि त्यातल्या वैज्ञानिकांची आयुष्यं यांची रंजक गुंफण आणि जीवशास्त्राच्या प्रचंड मोठ्या कालपटलाचा वेध घेणारा नयनरम्य कॅलिडोस्कोप म्हणजे सजीव हे पुस्तक
-
Pravas (प्रवास)
प्रवास कोणतीही आधुनिक साधनं नसताना, जगाची फारशी ओळख नसताना दर्यावर्दींनी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता १३ ते १७ व्या शतकांच्या काळात अनेक देश शोधून काढले. या साहसवीरांच्या प्रवासकथा, ते सोबत नेत असलेली होकायंत्रं, नकाशे अशी दिशादर्शक उपकरणं, जहाजांची निर्मिती, चाकांचा शोध, सायकल, रेल्वे, मोटरगाड्या, फुगे, एअरशिप्स, अवकाशयानं यांच्या निर्मितीकथा, उपयुक्तता, इतर गमतीजमती आणि अनेक रंजक कथांनी परिपूर्ण असलेलं तसंच भविष्यातल्या वाहनांचाही वेध घेणारं पुस्तक म्हणजे ‘प्रवास’