Thevnitlya Chija

By (author) K. J. Purohit Publisher Majestic Prakashan

भूत आणि भविष्य या जीवनाच्या दोन फांद्यांवर बांधलेल्या काळाच्या हिंदोळ्यावरील झोके म्हणजे या ठेवणीतल्या चिजा. शान्ताराम तथा के. ज. पुरोहित यांच्या`व्रात्यस्तोम’, `मी असता’ आणि `आठवणींचा पार’ या पुस्तकांसारखेच, पण त्यांच्या कितीतरी पुढे वाचकाला घेऊन जाणारे असे हे ठेवणीतल्या चिजा’ हे पुस्तक. रूढार्थाने हे आत्मचरित्र नव्हे; ते आहे एका मोठ्या संवेदनशील लेखकाच्या आत्म्याचे चरित्र. कधी गंभीर; कधी खुसखुशीत; कधी विचारगर्भ तर कधी विनोदी; कधी डोळ्यांच्या कडा ओल्या करणार्‍या;कधी अंतर्मुख करणार्‍या; कधी छाकट्या तर कधी सरळ; मराठी गद्याचे ललित वैभव प्रकट करणार्‍या `मालगुडी ते ब्रह्मपुरींपासून’ तो `स्वप्नस्थ वास्तव’ पर्यंतच्या या ठेवणीतल्या चिजा.

Book Details

ADD TO BAG