Pradhyapak Vaikaranchi Katha
तिची नजर समोर फ्लॅटच्या दाराकडे गेली. दाराच्या बाहेरच एक अगदी कृश शरीराचे गृहस्थ उभे असलेले तिला दिसले. ते बाहेरच का उभे आहेत? आत का येत नाहीत? तिच्या बालमनाला प्रश्न पडला होता - आणि विशेष म्हणजे त्यांचा चेहरा किती दु:खी होता ! डोळ्यांतून सारखं पाणी येत होतं, ते दाराच्या मागच्या बाजूने डोळे पुसत होते - आणि पुन्हा आत पहात होते. मघाशी होमाच्या धुराने तिच्याही डोळ्यांना पाणी आलं होतं - पण आता तर काही धूर नव्हता, मग ते रडत होते की काय? तिची नजर पुन्हा समोर गेली तेव्हा तिथे ते गृहस्थ नव्हते...