-
Nyaymandir (न्यायमंदिर)
“त्यानं आपले हात पसरले. नीलम त्याच्या कह्यात उभी राहिली. तिच्याभोवती त्याचे अजस्र हात एकत्र आले व तिच्या तोंडून शब्द निघायच्या आत एक दोन पावलं पुढे टाकून त्यानं खालच्या अंधाऱ्या गर्तेत उडी घेतली. शहराचे दिवे गरगरत वर येत आहेत असं नीलमला वाटलं. भीतीनं तिचा श्वास घशात अडकला. तिच्या तोंडून किंकाळी अर्धवटच निघाली... पण त्या दिव्यांची गती मंदावली, थांबली. ते दिवे तिच्या पायाखाली चक्राकार फिरले व दूरदूर जाऊ लागले. जयेंद्रनं आपले प्रचंड पंख मागं उघडले असले पाहिजेत. त्या शक्तिमान पंखाच्या प्रत्येक झडपेबरोबर ती वरवर चालली होती. प्रथम शहराचा विस्तीर्ण, मनोरम प्रदीपित देखावा तिच्या खाली पसरला; पण तोही लहान लहान होत गेला. इवल्याशा पांढऱ्या अभ्रीच्या कवचातून ते वर आले. त्यांच्या पायाखाली ते कापसाच्या रुजाम्यासारखे पसरले होते. त्यांच्याभोवती फक्त रात्रीचा थंड वारा आणि हिऱ्यासारख्या चांदण्या होत्या. नीलमला वाटलं हा विलक्षण आनंद आपल्या मनात सामावणार नाही. डोळे मिटून तिनं त्याच्या छातीवर डोकं टेकवलं. त्या कठीण आवरणातून तिच्या कानांना त्याचे छातीचे अति संथ ठोके जाणवत होते. ‘ठक्......ठक्......! ठक्......ठक्...’
-
Aisi Ratne Melavin (ऐसी रत्ने मेळवीन)
गुलशनच्या दारावरील घंटीवर डॉक्टरनी जरासे बोट टेकवले व काढले. आतून संतापाचा आवाज आला व दार एका तरुण स्त्रीने उघडले. आताच्या वेळी ती कोणाही भेटणाऱ्यांची अपेक्षा करीत नव्हती; हे तिच्या कपड्यांवरुन उघड दिसत होते. तिच्या अंगावर एक झिरझिरीत नायलॉनची साडी होती व त्या आत काहीहि नव्हते. डॉक्टरांच्या चेहऱ्याकडे ती क्षणभर आश्चर्याने पाहत राहिली. डॉक्टरांनी मनात आणले तर ते आपला चेहरा इतका सरळ व प्रांजळ ठेवू शकतात, की कोणालाही त्यांचा अजिबात संशय येणार नाही.
-
Anolkhi Disha Bhag-3 (अनोळखी दिशा भाग-3)
गेल्या सहा दशकांहून अधिक काळ सातत्याने भयकथा लिहून वाचकांना विस्मयचकित करणारे नारायण धारप यांचे ‘अनोळखी दिशा’ हे पुस्तक म्हणजे आजवर त्यांनी लिहिलेल्या निवडक भयकथांचा संग्रह आहे. नारायण धारप हे नाव आताच्या वाचन करणार्या पिढीला नवीन असलं, तरीही आपल्या रहस्यमय लेखकाने त्यांनी एक काळ गाजवला होता. गेल्या शतकातील साठच्या दशकात त्यांनी लेखनाला प्रारंभ केला आणि त्यानंतर अखेरपर्यंत ते सातत्याने लिहीत राहिले आहेत. दूरदर्शन आणि इतर प्रसारमाध्यमांची फारशी चलती नव्हती, त्या काळात सामान्य वाचक अतिशय आतुरतेने त्यांच्या लेखनाची वाट पाहत असत. नारायण धारपांच्या कथा ‘कथा’ या विकाराची अनेक रूपे घेऊन येतारत. कथानकात पुढे काय घडणार याची उत्सुकता कायम ठेवत वाचकाला आपल्या लेखनात गुंतवून ठेवणे, रहस्यमय व गूढ पद्धतीने भयाच्या तावडीत माणसे कशी सापडतात, शरीरिक व मानसिक वेदना कशी भोगतात, भूत-पिशाच्च, क्रुर पीडा देणार्या जीवनसृष्टीच्या काल्पनिक जगाचे अस्तित्व कसे जाणवते आणि दैवर शक्तीने, चमत्काराच्या कृपेने त्यातून ती कशी सुटतात याचे वर्णन अतिशय चित्तवेधक आहे. माणसाला नेहमीच कोणतेही रहस्य जाणून घेण्याच मुळातच उत्कंठा असते. जितके समाधान वाचनातून मिळते तितके दुसर्या कोणत्याही माध्यमातून मिळत नसल्यसामुळे वाचनाकडे असकर्षित झालेली नवी पिढी रहस्यमय व गूढ कथेच्या शोधात असते. वाचकांची ही भूक भागविण्याचे काम नारायण धारपांचे साहित्य करते. एकूणच मराठी साहित्यात रहस्य व गूढतेचे दालन समृद्ध करणार्या लेखकात नारायण धारपांचे स्थान वरचे आहे. धारपांच्या अद्भुत घटनांचे तर्कातीत मनोव्यापारांचे खेळ वर्णन करणार्या या कथा वाचकांना एका जागेवर खिळवून ठेवतात, हे वेगळे सांगायला नको.
-
Ikmai (इकमाई)
या झाडांच्या जंजाळात कोणीतरी आहे. नुसतंच कोणीतरी नाही...कोणीतरी ओळखीचं...श्री! चारी बाजूंनी त्याला झाडांनी वेढून टाकलं होतं. श्रीचा सुंदर, प्रिय चेहरा आता भांबावल्यासारखा घामाघूम झाला होता. ‘श्री!’ माझ्या अगदी अंतर्मनातून ती हाक घुमून उठली. श्रीची मान एकदम वर आली. माझ्या दिशेने वळली. त्याच्या चेहऱ्यावरचा सर्व संभ्रम एका क्षणार्धात नाहीसा झाला....त्याच्या चेहऱ्यावर एक ओळखीचं हास्य उमलायला लागलं आणि सर्वकाही अदृश्य झालं! माझ्याभोवती अंधारी खोली होती. अंधार नि:शब्द होता. धडधड ऐकू येत होती, ती माझ्याच काळजाची होती. हातापायांना घाम आला होता. शरीर थरथरत होतं. तो भयंकर भास नाहीसा झाल्याची मी पुन्हा खात्री करून घेतली आणि मगच माझा श्वास मंदावला. माझ्या स्वत:च्या दु:खावरून लक्ष काही काळ उडालं होतं. आणि आताच्या या अद्भुत दर्शनाचा विचार मनात येत होता. आताच्या या दृश्याला काही सांकेतिक अर्थ होता का? माझ्याभोवतीच्या असह्य परिस्थितीलाच मनाने एक सांकेतिक रूप दिलं होतं का? मनाची जखम इतकी खोल होती का, की जी मेंदूलाही चाळवील? - प्रस्तुत कथासंग्रहातून
-
Shaducha Shap (शाडूचा शाप)
नारायण धारप हे नाव आताच्या वाचन करणार्या पिढीला नवीन असलं, तरीही आपल्या रहस्यमय लेखनाने त्यांनी एक काळ गाजवला होता. गेल्या शतकातील साठया दशकात त्यांनी लेखनाला प्रारंभ केला आणि त्यानंतर अखेरपर्यंत ते सातत्याने लिहीत राहिले आहेत. दूरदर्शन आणि इतर प्रसारमाध्यमांची फारशी चलती नव्हती, त्या काळात सामान्य वाचक अतिशय आतुरतेने त्यांच्या लेखनाची वाट पाहत असत. नारायण धारपांच्या कथा भय या विकाराची अनेक रूपे घेऊन येतात. कथानकात पुढे काय घडणार याची उत्सुकता कायम ठेवत वाचकाला आपल्या लेखनात गुंतवून ठेवणे, रहस्यमय व गूढ पद्धतीने भयाच्या तावडीत माणसे कशी सापडतात, शारीरिक व मानसिक वेदना कशी भोगतात, भूत-पिशाच्च, क्रूर पीडा देणार्या जीवसृष्टीच्या काल्पनिक जगाचे अस्तित्व कसे जाणवते आणि दैवी शक्तीचे, चमत्काराच्या कृपेने त्यातून ती कशी सुटतात याचे वर्णन अतिशय चित्तवेधक आहे. माणसाला नेहमीच कोणतेही रहस्य जाणून घेण्याची मुळातच उत्कंठा असते. जितके समाधान वाचनातून मिळते तितके दुसर्या कोणत्याही माध्यमातून मिळत नसल्यामुळे वाचनाकडे आकर्षित झालेली नवी पिढी रहस्यमय मिळत नसल्यामुळे वाचनाकडे आकर्षित झालेली नवी पिढी रहस्यमय व गूढ कथेच्या शोधात असते. वाचकांची ही भूक भागविण्याचे काम नारायण धारपांचे साहित्य करते. एकूणच मराठी साहित्यात रहस्य व गूढतेचे दालन समृद्ध करणार्या लेखकात नारायण धारपांचे स्थान वरचे आहे. धारपांच्या अद्भूत घटनांचे तर्कातील मनोव्यापारांचे खेळ वर्णन करणार्या या कथा वाचकांना एका जागेवर खिळवून ठेवतात, हे वेगळे सांगायला नको.
-
Swapnamohini (स्वप्नमोहिनी)
ॲस्ट्रोपायलट दिक्पाल आर्य .….. धाडसी, हरहुन्नरी, हजरजबाबी, प्रसंगावधानी अशा दिक्पालची मंगळावर जाण्यासाठी निवड झाली . पृथ्वीवरील मानवांचा प्रतिनिधी म्हणून मंगळावर जाण्याचा प्रथम मान मिळणं, ही भूषणावह गोष्ट होती . दिक्पाल मंगळावर उतरला …यानातून बाहेर पडून चालत जाताना त्याच्या सहकाऱ्यांना तो दिसलाही … पण तेवीस दिवसांनी परत येणं अपेक्षित असणारा दिक्पाल तब्बल २५ ९ दिवसांनी परतला. एवढे दिवस कुठे होता तो? विश्वातल्या अज्ञात, अकल्पित आणि अनपेक्षित घडामोडींची आणि मानवाच्या राक्षसी महत्वाकांक्षेची थरारक कथा.. स्वप्नमोहिनी! विख्यात भयकथा, गूढकथा आणि विज्ञानकथा लेखक नारायण धारप यांची सर्वच वयाच्या वाचकवर्गाला गुंगवून टाकणारी कादंबरी