-
Savtya (सावटया)
त्या रात्री मी खोलीत एकटाच होतो. दाराला बाहेरून कुलूप होतं. दाराला एक लहान खिडकी होती. खिडकीला तारांची काच होती. त्या काचेच्या चौकोनावर माझं लक्ष होतं. डॉक्टर त्यांच्या रात्रीच्या राउंडवर येण्याची मी वाट पहात होतो. त्याचवेळी माझ्या डोक्यात अगदी मागे एक कलकल सुरु झाली. एखाद्या भुंग्याने लाकूड पोखरावं, तसं काहीतरी माझा मेंदू पोखरत होतं. एखादं गिरमिट फिरावं तसं ते गरगरत होतं, लांब जात होतं, परत जवळ येत होतं… आधी मला वाटलं हा त्या 'सावटया' चाच खेळ आहे..
-
Grahan.(ग्रहण )
धारप हे नाव आताच्या वाचन करणा-या पिढीला नवीन असलं, तरीही आपल्या रहस्यमय लेखनाने त्यांनी एक काळ गाजवला होता, ही गोष्ट कधीच न विसरण्यासारखी आहे. गेल्या शतकातील साठच्या दशकात त्यांनी लेखनाला सुरुवात केली आणि त्यानंतर अखेरपर्यंत ते सातत्याने लिहीत राहिले आहेत. मराठी साहित्यात रहस्यकथेचे आणि कादंबरीचे दालन समॄद्ध करणारे जे काही मोजकेच स्वतंत्र्य लेखन करणारे लेखक आहेत, त्यांत नारायण धारपांचे स्थान अव्वल आहे. कथानकात पुढे काय होणार याची उत्सुकता कायम ठेवत, वाचकाला आपल्या लेखनात गुंतवून ठेवणे, इतकेच नाही तर त्या वातावरणाचा एक भाग बनविण्याचे कसब ज्या काही लेखकांना साध्य झाले; त्यापैकी नारायण धारप एक आहेत, ही गोष्टही आवर्जून नमूद करण्यासारखी आहे.