Savtya (सावटया)
त्या रात्री मी खोलीत एकटाच होतो. दाराला बाहेरून कुलूप होतं. दाराला एक लहान खिडकी होती. खिडकीला तारांची काच होती. त्या काचेच्या चौकोनावर माझं लक्ष होतं. डॉक्टर त्यांच्या रात्रीच्या राउंडवर येण्याची मी वाट पहात होतो. त्याचवेळी माझ्या डोक्यात अगदी मागे एक कलकल सुरु झाली. एखाद्या भुंग्याने लाकूड पोखरावं, तसं काहीतरी माझा मेंदू पोखरत होतं. एखादं गिरमिट फिरावं तसं ते गरगरत होतं, लांब जात होतं, परत जवळ येत होतं… आधी मला वाटलं हा त्या 'सावटया' चाच खेळ आहे..