Ikmai (इकमाई)

By (author) Narayan Dharap Publisher Saket Prakashan

या झाडांच्या जंजाळात कोणीतरी आहे. नुसतंच कोणीतरी नाही...कोणीतरी ओळखीचं...श्री! चारी बाजूंनी त्याला झाडांनी वेढून टाकलं होतं. श्रीचा सुंदर, प्रिय चेहरा आता भांबावल्यासारखा घामाघूम झाला होता. ‘श्री!’ माझ्या अगदी अंतर्मनातून ती हाक घुमून उठली. श्रीची मान एकदम वर आली. माझ्या दिशेने वळली. त्याच्या चेहऱ्यावरचा सर्व संभ्रम एका क्षणार्धात नाहीसा झाला....त्याच्या चेहऱ्यावर एक ओळखीचं हास्य उमलायला लागलं आणि सर्वकाही अदृश्य झालं! माझ्याभोवती अंधारी खोली होती. अंधार नि:शब्द होता. धडधड ऐकू येत होती, ती माझ्याच काळजाची होती. हातापायांना घाम आला होता. शरीर थरथरत होतं. तो भयंकर भास नाहीसा झाल्याची मी पुन्हा खात्री करून घेतली आणि मगच माझा श्वास मंदावला. माझ्या स्वत:च्या दु:खावरून लक्ष काही काळ उडालं होतं. आणि आताच्या या अद्भुत दर्शनाचा विचार मनात येत होता. आताच्या या दृश्याला काही सांकेतिक अर्थ होता का? माझ्याभोवतीच्या असह्य परिस्थितीलाच मनाने एक सांकेतिक रूप दिलं होतं का? मनाची जखम इतकी खोल होती का, की जी मेंदूलाही चाळवील? - प्रस्तुत कथासंग्रहातून

Book Details

ADD TO BAG