Khade Aani Orakhade (खडे अणि ओरखडे)

By (author) D M Mirasdar Publisher Rasik Aantarbharathi

राजकारण हे काही मिरासदारांचे क्षेत्र नाही. दैनंदिन राजकारणाशीही त्यांचा संबं­ध नाही. दैनंदिन वृत्तपत्रे वाचून आणि क्वचित प्रसंगी राजकीय नेत्यांची भाषणे ऐकून सामान्य माणसाला जे काही राजकारणाचे ज्ञान होते, तेवढेच त्यांचे ज्ञान आहे; पण पिंड विनोदी लेखकाचा आहे. माणूस नावाच्या प्राण्याबद्दल प्रचंड कुतूहल आहे. राजकारणातील माणसाकडेही याच कुतूहलाने ते पाहतात. त्यामुळे या क्षेत्रातल्या अनेक प्रकारच्या विसंगती आणि हास्यकारक घटना, वक्तव्ये याकडे त्यांचे लक्ष जाते. त्यातूनच या स्वरूपाच्या लेखनाचा किंवा टीकाटिप्पणीचा जन्म झाला. विडंबन, उपहास, अतिशयोक्ती, उपरो­ध या विनोदाच्या भात्यातील अस्त्रांचा वापर यात त्यांनी विपुलतेने केला आहे.

Book Details

ADD TO BAG