Hasnbadhh (हसंबद्ध )

By (author) Mukund Taksale Publisher Majestic Prakashan

जत्रेतल्या अंतर्गोल-बहिर्गोल आरशापुढं उभं राहिलं की आपलीच प्रतिबिंब आपल्याला हसायला लावतात. मुकुंद टाकसाळे यांनी ‘हसंबद्ध’मधील कथांच्या रूपानं आपल्या समाजासमोर असाच आरसा धरला आहे. आपल्या अवतीभोवती वावरणार्‍या व्यक्तिरेखांच्या या आरशात उमटणार्‍या प्रतिमा आपल्याला मनमुराद हसवतात. चित्रमय निवेदनशैलीमुळे टाकसाळ्यांच्या या कथा विनोदी लघुपट बनून गेले आहेत. साध्यासुध्या शब्दातून, लहानसहान प्रसंगातून टाकसाळे विनोदाला अनुकूल वातावरण निर्माण करतात. सामान्य व्यक्तिरेखांतला सामान्यपणा दाखवत किरकोळ घटनांतून फार मोठ्या आकाराचा फार्स ते आकारला आणतात. दत्तू बांदेकर, चिं. वि. जोशी, पु. ल. देशपांडे यांनी निर्माण केलेली दर्जेदार विनोदी वाङ्‌मयाची परंपरा पुढं चालवणारा हा कथासंग्रह आहे.

Book Details

ADD TO BAG