Sun Ja Dil Ki Dasta (सुन जा दिल की दास्तां…)
ससंगीत…, मन, संवेदना, स्पंदनांना मदहोश करणारे अभिव्यक्तीचे एक अत्यंत सुमधूर माध्यम. या माध्यमाला इतक्या कलात्मक लडिवाळपणे सांभाळणारा कलेचा खरा प्रामाणिक उपासक मला आजपर्यंत भेटला नव्हता. संगीताच्या अनुभूती अनुभवतांना देश, भाषा वा कोणत्याही सीमा व्यक्तीला जाणवत नाहीत. एख विशुद्ध आनंद समरस होऊन लुटायची तयारी असणारे मन ज्याच्याठायी आहे त्याने हे सीमातीत सुख भान हरवून उपभोगावे. जयंताचा छंद जणु सुचवतोय- जपण्यासारखे खुप आहे. व्यक्तीचे मन, आवडी-निवडी, भावना, संस्कृती, परंपरा, मूल्य, कला आणि बरेच, बरे… जयंताच्या व्यक्तित्वात आस्था आहे, व्यवहारात माणुसकी आहे, प्रयत्नांना निश्र्चित उद्देश आहे, तथ्यपूर्ण, अर्थपूर्ण लयबद्ध शोधण्याची, जपण्याची ओढ आहे. या सुरांच्या भागीदारीत कशाची अपेक्षा नाही. हृदय, संवेदना, स्पंदनांना जिंकणार्या सुरांच्या बेसुमार वैभवायचे रंग ज्याच्या जीवनात मिसळले आहेत त्या जयंताची भेट घ्या आणि जीवनातील सहजतेत स्वाभाविकपणा शोधण्याची कला शिकून घ्या. जयंत तुम्हाला कानमंत्र देतील ते स्वतःला विसरून जगण्याचा आणि तुमचा निरोप घेतांना दिलखुलास हंसून तुम्हाला ऐकवतील… ``हम है और आपकी खुशी है आजकल, जिंदगी, जिंदगी हैआजकल…’’ त्या क्षणी तुमच्या जागी मी असेन तर निश्र्चित म्हणेन… “My Hats off to You Jayant…!”