Jwala Aani Phul (ज्वाला आणि फूल)
या रचनेत काव्य नि:संशय, पण केवळ काव्यात्मक अनुभूती व्यक्त करणे एवढेच तिचे कार्य नाही. इथे तरल काव्यात्मता आणि ज्वलंत विचार एकजीव झाले आहेत. सौंदर्य आणि सामर्थ्य यांचा संगम सांगणा-या एका थोर आत्माच्या या जळजळीत अविष्कारात कुठेही क्लिष्टता आढळणार नाही या सर्व चिंतनात एका प्रकारची धुंदी आहे, जोश आहे, आव्हान आहे.एकाच वेळी शिंगे, तुता-या रणभेरी वाजव्यात तशा प्रकारचा शब्दांचा, कल्पनांचा आणि विचारांचा कल्लोळ येथे आहे हे शब्द आणि या कल्पना, जीवन उत्कटतेने जीवन जगात असताना एका प्रज्ञावंताच्या हृदयाला झालेल्या जखमातल्या रक्ताने माखलेल्या आहेत. हे रक्त नुसते भळभळ वाहत नाही. चिळकांडी उडत असताना त्याचे ज्वालेत रुपांतर होते. कारण बाबासाहेबांची अनुभूती केवळ हळव्या भावनेच्या किंवा क्षणिक वेदनेच्या टप्प्यापाशी थांबत नाही तर स्वतंत्र बुद्धीने आजच्या उदवस्त मानवाच्या पुनररुज्जीवानाचा ही अनुभूती शोध घेते.