Zen (झेन)
तणावात, चिंतेत किंवा अस्वस्थ असल्यावर, मार्ग सुचत नसेल, निर्णय घेता येत नसेल, मनात गोंधळ असेल तर झेन कथा एखादी लहानशीच पण लख्ख मर्मदृष्टी देऊ शकतात. असा मार्ग दाखवू शकतात, जो अंत:प्रेरणेने चिंता व तणावमुक्त करू शकतो. या कथा 'हाऊ टू…' सारख्या माहितीपर मार्गदर्शन करणारया नाहीत, तर आतूनच उजळत नेणारया, समृद्ध करणारया ज्ञानासारख्या आहेत. या कथा आजच्या धकाधकीच्या, स्पर्धेच्या कोलाहलात, जीवघेण्या, रणरणत्या प्रवासात विसाव्याला येणारया झाडाच्या दाट सावलीसारख्या आहेत. बसावं, शांत व्हावं, उर्जा प्राप्त करावी आणि पुढची वाटचाल जोमाने सुरु करावी. व्यक्तिमहत्व विकासासाठी एक वेगळा अर्थपूर्ण आयाम देण्याची क्षमता या कथांमध्ये आहे. मनुष्य जीवन आनंदी जगण्यासाठी आहे, ऊर फुटेस्तोवर धावण्यासाठी नाही. जगण्यातला आनंद नक्की कशात आहे, तो शोधण्याची सम्यक दृष्टी या कथांत आहे. आयुष्याचा प्रत्येक क्षण आनंदमय कसा करता येईल, ते या कथा सांगतात. 'आतला आवाज ऐकण्याची प्रेरणा देण्यारया या कथांमध्ये शेकडो पिढ्यांचा सजग, सम्यक ज्ञानाचा संचय झालेला आहे. जो हरक्षणी पथदर्शक म्हणून उपलब्ध आहे. अंधारलेला रस्ता उजळण्यासाठी हाती घेतलेल्या दीव्यासारख्या या कथा आहेत. बुद्धाच्या उपदेशाचे सार या कथांमध्ये आहे, ते म्हणजे अत्त दिप भव