-
Don Chak Jhapatleli (दोन चाकं झपाटलेली)
२००० सालापुर्वीचा - 'इंटरनेट, सेलफोन' जमान्यापुर्वीचा काळ असला म्हणून काय झालं ? आमची 'दोन चाकं' जेव्हा गरुडभरारीची झाली तेव्हा देशोदेशींचे रस्ते जणू आकाशासारखे मुक्त झाले. 'आयफेल टॉवर','नायगारा', 'ऑक्सफर्ड प्युनिव्हर्सिटी' तर हॉटेलांत मुक्काम करणारे सारेच पर्यटक पाहतात.आअम्च मुक्काम तंबू ठोकून वा युथ होस्टेल्समध्ये वा मोटेल्समध्ये झाला. देशोदेशींची पर्यटकप्रिय स्थळं, निसर्गनिर्मित नि मानवनिर्मित चमत्कार आम्ही पहिलेच. पण त्याहीपलीकडे…१८६७ साली बनलेली आदिम सायकल, शतकापूर्वी मातीत सोन्याचा अंश सापडल्याने जी 'सुवर्णभूमी ' झाली होती,तिची सुवर्णांश ओसरल्यानंतर झालेली ओसाड 'भूतनगरी';'न्यूडबीच' वरचं नग्नविश्व; नाशबाजांच्या सुयांच्या खचांमुळे,झाडाफुलांच्या उद्यानाचं झालेलं 'निडल पार्क';आदी अनवट चीजा त्या ३२० दिवसांच्या भ्रमंतीत आम्हाला पाहता आल्या. हॉलंडमधल्या गुरुद्वारात खलिस्तानी पासपोर्ट -व्हिसा नि खलिस्तानी चलनाच्या प्रतिकृती पाहताना आम्ही क्षोभग्रस्त, शोकग्रस्त झालो. जगातले २४ देश सायकलींवरून फिरताना; भिन्नभिन्न संस्कृती, भाषांचे अडसर आणि परदेशस्थ भारतीयांची स्वदेशओढीमुळे होणारी अखंड काळीजकुरतड आम्हाला अनुभवता आली. 'सायकल वापर : प्रदूषणमुक्त पर्यावरणासाठी' हा जिवंत संदेश,शब्दांशिवाय कृतीने नि भारत देशाच्या वतीने देत फिरताना आमचे देशोदेशी सत्कार झाले. पण त्याहून महत्वाचं हे होतं,की-५ते +४८ अंश सेल्सिअस अशा भयकारी तापमानातून, क्रूर वादळवाऱ्यातून दिवसातले कित्येक तास सलगपणे सायकल चालवताना आम्हाला आमच्या क्षमता तपासून पाहता आल्या. मोहिमेच्या आखणीतल्या आव्हानाने आणि त्या ३२० दिवसांच्या आंतरराष्ट्रीय सायकलसफारीने आम्हाला हयातभराची समृद्धी दिली.
-
Dagalbaj Shivaji (दगलबाज शिवाजी)
अर्जुन 'बगलबाज' होता. कर्तव्याला बगल मारून पळत होता. पण शिवाजी तसा नव्हता. तो वाकड्या दाराला वाकडी मेढ ठोकून समोर येईल त्या मुकाबल्याचा फडशा पडणारा 'दगलबाज' होता.'दगलबाज' आणि दगाबाज यातील भेदच लोकांना समजत नाही. 'दगलबाज' म्हणजे 'डिप्लोमॅट'. दगाबाज म्हणजे 'ट्रेचरस'.इरसाल मुत्सद्दी हा दगलबाजच असावा लागतो. कळले?....('माझी जीवनगाथा' तून) बगलबाज अर्जुन आणि दगलबाज शिवाजीय तुलनेत विचारांचे ब्रह्मांड आहे. भारतीय समरभूमीवरील अर्जुन आणि प्रतापगडावर अफझुलखानापुढे उभा ठाकलेला शिवाजी, यांची तुलना केली, तर अर्जुनापेक्षा शिवाजी शतपट श्रेष्ठ ठरतो. काका, मामा, आप्पा, बाबा यांना कसे मारू या क्षुद्र कल्पनेला बळी पडून, विहित कर्तव्याला बगल मारून पळू पाहणारा बगलबाज अर्जुन पहा आणि भेटीचे ढोंग करून दगा देण्यास आलेल्या दगलबाज अफझुलखानाला त्याच्याच युक्तीने गारद करणारा कर्तव्यतत्पर सवाई दगलबाज शिवाजी पहा. म्हणजे कर्तव्याकर्तव्याचे कोडे थोडे तरी सुटेल. ('दगलबाज शिवाजी' तून)
-
Vkrutva Kala Ani Sadhana (वकुत्व कलाआणि साधना)
अनेक नामंकित देशी-परदेशी वक्त्यांची भाषणे मी ऐकत असे नि ऐकलीही होती. कित्येकांची तर ध्वनिलिखितही केलेली होती. प्रत्येकाची लकब निराळी. काही केवळ विद्वतेच्य प्रदर्शनासाठी बोलत. त्यांची व्याखाने श्रोते पुराणिकाच्या ठराविक धाटणीसारखी भक्तीभावाने ऐकत. ऐकत म्हणजे काय? तर एका कानाने ऐकून दुस-या कानाने बाहेर सोडीत.कसं काय झालं व्याख्यान? तर वक्ता विद्वान, विलक्षण अभ्यासू. आपल्याला समजणार त्यात, हा परिणाम. कित्येकांची भाषणे मधुरमधुर शब्दांचा नुसता सडा. श्रोत्यांनी नुसता ऐकावा नि कौतुक करीत सभागृहाबाहेर पडावे. कित्येकांची भाषेपेक्षा हातवारेच जबरदस्त. असले नाना प्रकार पाहून वकृत्व- परिणामकारक वकृत्व असावे कसे आणि ते कमवण्यासाठी उमेदवारांनी स्वधायाची, आवाजाच्या कमावणीची, हावभाव मुद्राभियनाची कसकशी तयारी केली पाहिजे, इत्यादी अनेक मुद्दयांची मी चार-पाच वर्षे टिपणे करीत होतो, आणि त्याविषयीची पाश्चात्य पुस्तके अभ्यासित होतो.
-
Zen (झेन)
तणावात, चिंतेत किंवा अस्वस्थ असल्यावर, मार्ग सुचत नसेल, निर्णय घेता येत नसेल, मनात गोंधळ असेल तर झेन कथा एखादी लहानशीच पण लख्ख मर्मदृष्टी देऊ शकतात. असा मार्ग दाखवू शकतात, जो अंत:प्रेरणेने चिंता व तणावमुक्त करू शकतो. या कथा 'हाऊ टू…' सारख्या माहितीपर मार्गदर्शन करणारया नाहीत, तर आतूनच उजळत नेणारया, समृद्ध करणारया ज्ञानासारख्या आहेत. या कथा आजच्या धकाधकीच्या, स्पर्धेच्या कोलाहलात, जीवघेण्या, रणरणत्या प्रवासात विसाव्याला येणारया झाडाच्या दाट सावलीसारख्या आहेत. बसावं, शांत व्हावं, उर्जा प्राप्त करावी आणि पुढची वाटचाल जोमाने सुरु करावी. व्यक्तिमहत्व विकासासाठी एक वेगळा अर्थपूर्ण आयाम देण्याची क्षमता या कथांमध्ये आहे. मनुष्य जीवन आनंदी जगण्यासाठी आहे, ऊर फुटेस्तोवर धावण्यासाठी नाही. जगण्यातला आनंद नक्की कशात आहे, तो शोधण्याची सम्यक दृष्टी या कथांत आहे. आयुष्याचा प्रत्येक क्षण आनंदमय कसा करता येईल, ते या कथा सांगतात. 'आतला आवाज ऐकण्याची प्रेरणा देण्यारया या कथांमध्ये शेकडो पिढ्यांचा सजग, सम्यक ज्ञानाचा संचय झालेला आहे. जो हरक्षणी पथदर्शक म्हणून उपलब्ध आहे. अंधारलेला रस्ता उजळण्यासाठी हाती घेतलेल्या दीव्यासारख्या या कथा आहेत. बुद्धाच्या उपदेशाचे सार या कथांमध्ये आहे, ते म्हणजे अत्त दिप भव
-
Safai (सफाई )
सफाई' खूप आवडली. विशिष्ट समाजाच्या मानसिकतेची हि कांदबरी नस पकडते. तळागळातल्या माणसांचं जीवन समजताना उत्कठां वाढीस लागते. ओघवत्या भाषेतील कादंबरी वाचताना मी एकरूप झालो. फार पूर्वी 'मौज' दिवाळी अंकात व्यंकटेश माडगूळकरांची 'बनगरवाडी' मी अशीच झपाटून वाचून काढली होती. - रामकृष्ण केशव फणसळकर.