Dagalbaj Shivaji (दगलबाज शिवाजी)
अर्जुन 'बगलबाज' होता. कर्तव्याला बगल मारून पळत होता. पण शिवाजी तसा नव्हता. तो वाकड्या दाराला वाकडी मेढ ठोकून समोर येईल त्या मुकाबल्याचा फडशा पडणारा 'दगलबाज' होता.'दगलबाज' आणि दगाबाज यातील भेदच लोकांना समजत नाही. 'दगलबाज' म्हणजे 'डिप्लोमॅट'. दगाबाज म्हणजे 'ट्रेचरस'.इरसाल मुत्सद्दी हा दगलबाजच असावा लागतो. कळले?....('माझी जीवनगाथा' तून) बगलबाज अर्जुन आणि दगलबाज शिवाजीय तुलनेत विचारांचे ब्रह्मांड आहे. भारतीय समरभूमीवरील अर्जुन आणि प्रतापगडावर अफझुलखानापुढे उभा ठाकलेला शिवाजी, यांची तुलना केली, तर अर्जुनापेक्षा शिवाजी शतपट श्रेष्ठ ठरतो. काका, मामा, आप्पा, बाबा यांना कसे मारू या क्षुद्र कल्पनेला बळी पडून, विहित कर्तव्याला बगल मारून पळू पाहणारा बगलबाज अर्जुन पहा आणि भेटीचे ढोंग करून दगा देण्यास आलेल्या दगलबाज अफझुलखानाला त्याच्याच युक्तीने गारद करणारा कर्तव्यतत्पर सवाई दगलबाज शिवाजी पहा. म्हणजे कर्तव्याकर्तव्याचे कोडे थोडे तरी सुटेल. ('दगलबाज शिवाजी' तून)