You Are Under Arrest Gunhe Shodhkatha (यू आर अन्डर

By (author) Ashok Indalkar Publisher Continental Prakashan

पोलिस म्हणजे रुक्ष, भ्रष्टाचारी व सामान्यांना अडविणारे खाते, असा समज बहुतेकांचा असतो; पण या खात्यातही अनेक चांगली माणसे असतात. कायदा गरिबांसाठी वापरला पाहिजे, असे मानणारे, संवेदनक्षम पोलिस असतात. त्यापैकी एक म्हणजे अशोक इंदलकर हे पोलीस अधिकारी. राज्यात विविध ठिकाणी काम करताना आलेले अनुभव, तपासासाठी येणाऱ्या केस याबद्दल त्यांनी 'यू आर अंडर अरेस्ट'मधून लोहिले आहे. हे सर्व लिखाण वास्तव असल्याने राजघराण्यातील असूनही भणंग फिरणारा व खुनाच्या आरोपातून सुटणारा दिलीपसिंह, सोन्याचे हरवलेले दागिने शोधण्यासाठी महिला व राजकीय पार्श्वभूमी असलेल्या तिच्या पतीने केलेला पाठपुरावा, उच्चकुलीन पण बाहेरख्याली झालेला हिम्मतराव, ट्रेकिंगचा थरार, हरवलेली तरूण मुलगी सापडल्यानंतर वडिलांनी मानलेले आभार, पोलिस अधिकारी असूनही भीक मागायची वेळ आलेला गायकर, सीआयडी अधिकारी जयस्वाल, प्रेमवेडा कपिल यांच्याविषयी व गुंतागुंतीच्या गुन्ह्यांचा शोधकथा यात आहेत. यातील घटना खऱ्या असल्याने त्या वाचताना गुन्हेगारीचे, पोलिसांचे विश्व व पोलिसांमधील माणसाचे दर्शन यातून होते.

Book Details

ADD TO BAG