Naseeruddin Shah Ani Mag Ek Divas (नसीरुद्दीन शाह

नसीरचं लिखाण परखड आहे. कुठेही आडपडदा न ठेवता तो बेधडक लिहितो. स्वतःच्या प्रमादांबद्दलसुद्धा तो आत्मसमर्थन करण्याचा जरासुद्धा प्रयत्न करीत नाही. त्यामुळे काहीशा निर्मम इसमाची प्रतिमा डोळ्यांपुढे तरळते. पण मग नकळत पुस्तकाच्या पानांमध्ये दडलेल्या काही हळुवार आठवणी पुढे येतात आणि त्या वर्णनांमधून एक भावूक माणूस डोकावत राहतो’. - सई परांजपे खिळवून टाकणाऱ्या वाचनीय आठवणी... आनंददायी, गमतीदार, परखड, प्रामाणिक’. - रामचंद्र गुहा ‘आपल्याला दैवी वरदान प्राप्त आहे या समजातून बाहेर पडून एक अभिनेता म्हणून आपल्यातल्या सर्व सुप्त शक्ती जाणून घेण्यासाठी नसीरुद्दीन शाह याने केलेल्या संघर्षाचा लेखाजोखा. प्रामाणिक, गमतीदार, चमकदार’. -गिरीश कार्नाड

Book Details

ADD TO BAG

Other Books From the Category