Surbala (सूरबाला)
सुरबाला हि वेश्या आहे,यावर विश्वास बसत नाही. तिच्यावर झालेले संस्कार तिच्या डोळ्यांतून,तिच्या चेहऱ्यावरून झळकत होते . कुणी तिला या व्यवसायात ढकलले ? काय होती तिची मजबुरी ? नियतीचा हा निर्णय विचलित करणारा होता. आदिवासी लोकरीती आणि रूढींच्या वेढयात गुंफले आहेत. आबांनी सुरबालाला देवदासी करण्याचे का ठरवले ? आबा अंधश्रध्देला बळी पडले. सुरबालावर पुजाऱ्यांनी अत्याचार केले आणि सुधाकरने तिच्या कोवळ्या मुलीवर. हा दैवाचा थरारक हल्ला होता. सुरबालामुळे माझ्या घरात वादळ उठले. ते शमले ; पण त्या मायलेकींचे प्राण वेचून.