Navlai

विनोदी कथा लिहिणं हे विशेषच जबाबदारीचं काम असतं. विनोदाचं बोट सोडायचं नाही आणि कथेचा घाटही बिघडवायचा नाही. सुखठणकरांना हे उत्तम साधलेलं आहे. गंभीर समस्यांकडेदेखील सुखठणतर विनोदी चष्म्यातून पाहतात आणि स्थित्यंतरीय जीवनाचा मजेदार शोध घेतात. ‘एका स्वामीची क्रांती’, ‘डिंक डिंक ना रहा’, ‘सीआर गेला खड्ड्यात’, ‘सॅमची आई’ वगैरे कथांमधून विनोदाची फवारणी करतानाच सुखठणकरांनी विषयाचं गांभीर्य कमी होऊ न देण्याचं भान राखलेलं आहे. ही ‘नवलाई’ नटली आहे, अगदी आजच्या ताज्या विषयांवरील आणि माणसांच्या विविध वृत्तीप्रवृत्तींभोवती गुंफलेल्या कथांनी. सुखठणकरांचे नर्मविनोदी लेखन वाचकांना तणावमुक्त करून रोजच्या समस्यांना भिडण्यासाठी नवा जोम प्राप्त करून देतं. सुधीर सुखठणकर यांनी मराठी साहित्यात विनोदी लेखक म्हणून आपली वैशिष्ट्यपूर्ण मुद्रा या आधीच उमटवलेली आहे. वाचकांना पुन्हा एकदा याचा प्रत्यय ’नवलाई’ आणून देईल असा विश्वास वाटतो.

Book Details

ADD TO BAG