Vladimir Putin (व्लादिमिर पुतिन)

By (author) Atul Kahate Publisher Manovikas

सोव्हिएत युनियन आणि रशिया हा प्रकार जरा गूढच आहे. अलीकडच्या काळात व्लादिमिर पुतिन या रशियाच्या राष्ट्रपतीनं रशियाला त्याचं गतवैभव मिळवून देण्यासाठी सातत्यानं प्रयत्न केले असल्याची चर्चा सुरू असते. अमेरिका ही जगामधली एकमेव महासत्ता नसून तिला आव्हान देण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचं पुतिननं निरनिराळ्या मार्गांनी दाखवून दिलं आहे. 2016 सालची अमेरिकी राष्ट्रपतिपदासाठीची निवडणूक डोनाल्ड ट्रम्पच्या बाजूनं वळवण्यातसुद्धा पुतिनचा मोठा हात असल्याचं मानलं जातं. हा पुतिन नक्की आहे तरी कसा? त्याच्याविषयी अनेक आख्यायिका प्रसिद्ध आहेत. त्या खर्‍या आहेत का? तो हुकूमशहा आहे का? रशियासारख्या महाकाय देशावर त्याची एकहाती सत्ता कशी काय प्रस्थापित झाली? रशियामध्ये खरोखर लोकशाही आहे का? पुतिननं एवढी मोठी मजल कशी काय मारली? पुतिनविषयीचं सगळं रहस्य उलगडून दाखवणारं हे पुस्तक आहे.

Book Details

ADD TO BAG

Other Books From the Category