Zunj Mazi cancershi (झुंज माझी कॅन्सरशी)
खरंच का नियती इतकी निष्ठूर असते? येणार्या प्रत्येक जीवाला हातच्या खेळण्यासारखं खेळवते सर्व दोर हाती धरून कठपुतळीसारखं नाचवते खरंच का नियती इतकी निष्ठूर असते? चेहर्यावरचे हसू किती कठोरतेने पुसते डोळ्यातले पाणी पाहून निर्दयतेने हसते खरंच का नियती इतकी निष्ठूर असते? गेल्या जन्मीच्या पाप-पुण्याचे हिशेब या जन्मी मांडते आणि खरोखरीच निष्पाप जीवावर जीवघेणे अगाध करते खरंच का नियती इतकी निष्ठूर असते? दोन क्षणात होत्याचं नव्हतं करते पाहता - पाहता उभ्या जीवनाचं मातेरं करते खरंच का नियती इतकी निष्ठूर असते? पण हळूच कधी - कधी ओंजळ भरभरून सुख देते दुरावलेल्या जीवाला मायेची उब देते खरंच का नियती इतकी निष्ठूर असते?